शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! व्यवसायरोध भत्ता घेऊनही सरकारी डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:16 IST

खाजगी प्रॅक्टिस करू नये, यासाठी बेसिक वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता

ठळक मुद्देरुग्णालय प्रशासनाला पुरावाच मिळेनाडॉक्टरांची दुहेरी सेवा सुरु आहे

औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता दिला जातो. तरीही काही डॉक्टर बिनधास्तपणे खाजगी रुग्णालयांत प्रक्टिस करीत आहेत. वरिष्ठांपर्यंत हा प्रकार पोहोचला आहे; परंतु केवळ पुरावा नसल्याचे कारण पुढे करून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांना महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये वेतन दिले जाते, तसेच खाजगी प्रॅक्टिस करू नये, यासाठी बेसिक वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) मिळतो; परंतु येथील काही डॉक्टर खाजगी रुग्णालयातही बिनधास्तपणे ओपीडी, आंतररुग्ण सेवा देत आहेत. काही जण केवळ शस्त्रक्रियांपुरते खाजगीत जातात.

मात्र, अशाप्रकारे सेवा देतानाचे छायाचित्र, अन्य पुरावा मिळत नसल्याने कारवाईला अडचण येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तसेच खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिसच्या मुद्यावरून काही जण न्यायालयात गेलेे असेही सांगण्यात आले. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा दिली जात आहे. याठिकाणीही रुग्णसेवा देताना खाजगी रुग्णालयात रुग्णसेवेची दुहेरी भूमिका काही जण पार पाडत आहेत. अशा डाॅक्टरांची वरिष्ठांपर्यंत माहिती पोहोचली आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

कारवाई केली जाईलघाटीतील डाॅक्टरांना खाजगी रुग्णालयांत रुग्णसेवा देता येत नाही. दोन वर्षांपूर्वी काहींवर कारवाई करण्यात आली होती. योग्य पुरावा मिळाल्यास आताही कारवाई केली जाईल.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय 

प्रॅक्टिस करता येत नाहीआरोग्य विभागातील डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करता येत नाही. कंत्राटी असेल तरीही त्यांना खाजगीत प्रॅक्टिस करता येत नाही. केवळ काही लोकांनी न्यायालयात जाऊन प्रॅक्टिस मिळविली आहे. - डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबादmedicineऔषधं