शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड वापरून महिलेने उचलले महामंडळाकडून कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 17:53 IST

बनावट निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला तयार करून वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केली.

ठळक मुद्दे विमा व्यवसायात शेकडो लोकांना गंडविणारा विष्णू भागवतचा हात महामंडळाकडून यांनी नेमके किती कर्ज उचलले, हे पुढील तपासात समोर येईल.

औरंगाबाद : पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेने बनावट आडनाव, जात, रेशनकार्ड आदी कागदपत्रे तयार करून वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज उचलले व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार क्रांती चौक ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणात मुख्य मोहरा हा विमा व्यवसायात शेकडो लोकांना गंडविणारा विष्णू भागवत असून त्याच्यासह तिघाजणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सहायक निरीक्षक शांतीलाल राठोड यांनी सांगितले की, महावितरणच्या हर्सूल येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत रामदास धोंडिराम डोंगरे व त्यांची पत्नी रेखा रामदास डोंगरे यांचा कौटुंबीक न्यायालयात वाद सुरू आहे. रामदास व रेखाचा विवाह सन २००० मध्ये औरंगाबादेत झाला. त्यांना एक मुलगा आहे. नोकरीनिमित्त हे दाम्पत्य लातूर, नाशिक येथे सोबत राहिले. सन २००९ मध्ये रामदासने कर्ज काढून नाशिक येथे रो-हाऊस खरेदी केले व ते तेथे राहू लागले. सन २०१०-११ मध्ये रेखाने औरंगाबादेत ब्युटिशियनचा कोर्स केला. दरम्यानच्या काळात तिची व विष्णू भागवतसोबत ओळख झाली. तिने इंडस्‌ हेल्थ प्लसची डिस्ट्रीब्युटरशीप घेतली. त्यात विष्णू भागवतलाही रूजू करून घेतले. या कामात रेखाची विवाहित बहीण मदत करत होती. 

रामदास डोंगरे यांच्या गैरहजेरीत त्याची पत्नी व विष्णू भागवत व्यावसायिक मिटिंगचे कारण सांगून औरंगाबादेत अनेकदा मुक्कामला राहिले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या काळात तिने स्वत:च्या रेखा रामदास राठोड अशा नावाचे बनावट निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला तयार केला. त्याद्वारे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केली. या कामामध्ये तिची औरंगाबादेत राहत असलेली तिची बहीण व विष्णू भागवत यांनी मदत केली आहे. दरम्यान, सहायक निरीक्षक राठोड यांनी सांगितले की, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून यांनी नेमके किती कर्ज उचलले, हे पुढील तपासात समोर येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद