शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! दरमहा 5 कोटींचा औरंगाबादमध्ये येतो गुटखा; रस्त्याने येताना कारवाई का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 16:33 IST

मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाजगी वाहनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणण्यात येतो.

ठळक मुद्देशहरात पंचवीसपेक्षा अधिक गोडाऊनजिन्सी, सिटी चौक, वाळूज हद्दीत सर्वाधिक गोदामे

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद :  गुटख्यामुळे तरुणाई बरबाद होत आहे, म्हणून राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घातली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आजही राजरोसपणे गुटखा विकला जात आहे. गुटखा व्यवसायाची पाळेमुळे खोलपर्यंत रुजलेली असल्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी काहीच फरक पडत नाही. शहरात दरमहा किमान पाच कोटी रुपयांचा गुटखा येतो आणि विक्री होतो. यातील ७० टक्के गुटखा हा हा बोगस होममेड कंपन्यांनी तयार केलेला असतो, हे विशेष.

गुटख्यात दोन प्रकार मोडतात. पहिला प्रकार म्हणजे ओरिजनल गुटखा. ज्याला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. दुसरा प्रकार म्हणजे मिक्स होय. यामध्ये साधी सुपारी आणि तंबाखू वेगवेगळ्या पाऊचमध्ये विकला जाते. शहरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या टपरीसह किराणा दुकानावर राजरोसपणे हा गुटखा उपलब्ध आहे. कायदा, राज्य शासनाची बंदी झुगारून विक्री सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात आपला आवाज अधिक बुलंद केला तरीही काहीच उपयोग झाला नाही. शहरातील ७० टक्के तरुणाई या गुटख्याच्या आहारी गेलेली आहे. कॅन्सरसारख्या अत्यंत दुर्धर आजाराला आमंत्रण देणारा हा गुटखा शहरात येतो कसा, हे पाहणे अधिक मजेशीर आहे. 

रात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत येतात गाड्याशहरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा तयार होत नाही. हा सर्व गुटखा वेगवेगळ्या जिल्ह्यांतून औरंगाबाद शहरात दाखल होतो. मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाजगी वाहनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणण्यात येतो. शहरातील संबंधित गोडाऊनमध्ये गाडी रिकामी केल्यानंतर ती गाडी पहाटेच शहर सोडते. 

शहरात पंचवीसपेक्षा अधिक गोडाऊनराज्य शासनाने बंदी घातल्यानंतर गुटका किंगची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कमी गुंतवणूक आणि चारपट पैसा असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरले आहेत. शहरात गुटख्याचे किमान २५ पेक्षा अधिक गोडाऊन आहेत. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती गोडाऊन आहेत हे पोलिसांनाही माहीत आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पदभार घेतल्यानंतर पोलिसांनी गुटखा पकडण्याचा धडाका लावला आहे.

जिन्सी, सिटी चौक, वाळूज हद्दीत सर्वाधिक गोदामेशहरात सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गोडाऊन आहेत. पोलिसांनी यापूर्वी आणि एकदा कारवाया सुद्धा केल्या आहेत. मात्र, गोडाऊन बंद झालेले नाहीत. काही व्यापारी वाळूज येथे माल उतरवून घेतात. नंतर सोयीनुसार हळूहळू हा माल शहरात येतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद