शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

धक्कादायक ! परीक्षा विभागाने दिले कनिष्ठ लिपिकाला पेपर तपासण्याचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या बेफिकीर कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच संपलेल्या पदवी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एका महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकाला बोलावण्यात आले आहे. या लिपिकाने परीक्षा संचालकांना पत्र पाठवून आपले शिक्षण केवळ पदवीपर्यंतचे, इंग्रजीचे पेपर कसे तपासू? असा सवाल उपस्थित करणारे पत्र पाठविले. या प्रकरणात परीक्षा विभाग व महाविद्यालयाने आपली चूक झटकली आहे.

विद्यापीठाने नुकत्याच घेतलेल्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले आहे. यात वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेले नीलेश गणेश घंटे यांना परीक्षा विभागाने २६ मार्च २०१८ रोजी पत्र पाठवले. त्यात प्रोफेसर नीलेश गणेश घंटे असा उल्लेख करीत विद्यापीठाचे कुलगुरू आपणाला पदवी अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. शिवछत्रपती महाविद्यालयात एक ते सहा सत्रांतील  आपणाला उत्तरपत्रिका तपासाव्या लागतील. यासाठी आपणाला टीए, डीएसह इतर वेतन, मानधन नियमाप्रमाणे जागेवरच देण्यात येईल. विद्यापीठ कायद्यानुसार उत्तरपत्रिका तपासणे आपणास बंधनकारक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र मंगळवारी (दि. ३) हाती पडल्यानंतर अवाक् झालेल्या नीलेश घंटे यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना तात्काळ मेलद्वारे पत्र पाठवले. यात त्यांनी ‘आपण कनिष्ठ लिपिकपदावर कार्यरत असून, माझे शिक्षण वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंत झालेले आहे. तरी आपल्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका तपासणीसाठी पत्र प्राप्त झाले आहे. माझे शिक्षण बघता मी इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यास पात्र आहे का? मार्गदर्शन करावे,’ असा सवाल केला, कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार नीलेश घंटे यांचा प्राध्यापक म्हणून उल्लेख  असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले.

परीक्षा विभागाला मेल केला आहे विद्यापीठाने इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी माझ्या नावाने पत्र पाठविले. या पत्रात जर आपण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी न आल्यास विद्यापीठ कायद्यानुसार आपणावर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख आहे. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पात्र आहे का? असे मार्गदर्शन परीक्षा विभागाच्या मेलवर पत्र पाठवून विचारले.- नीलेश घंटे, कनिष्ठ लिपिक, विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर

संबंधित महाविद्यालयाची चूक विद्यापीठाकडे संलग्नीकरण करताना महाविद्यालयाने प्राध्यापकांच्या जोडलेल्या यादीत नीलेश घंटे यांच्या नावाचा समावेश आहे. त्याच यादीनुसार परीक्षा विभागाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी पत्रे पाठवली आहेत. यात परीक्षा विभागाची नव्हे, तर संबंधित महाविद्यालयाची चूक आहे. तरीही अशी काही पत्रे गेली असतील तर तपासून ती रद्द करण्यात येतील.- डॉ. दिगंबर नेटके, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाcollegeमहाविद्यालयEmployeeकर्मचारी