शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धक्कादायक ! बलात्कारानंतर तरुणीला विकण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:11 IST

काम मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला जालना येथे नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पाच लाखांत विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला

औरंगाबाद : काम मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेला जालना येथे नेऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पाच लाखांत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन पीडितेने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ही खळबळजनक घटना २८ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर दरम्यान जालना येथील एका लॉजवर घडली.  

गणेश बालाजी आर्दड (३०, रा. जालना) आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. २३ वर्षीय पीडितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती अडीच वर्षीय चिमुकलीसह राजनगर येथे माहेरी राहते. मुकुंदवाडी येथील रहिवासी आरोपी महिलेसोबत तिची ओळख झाली. तुला काम मिळवून देते, असे ती सतत सांगायची. २८ रोजी सकाळी १० वाजता तिने पीडितेला तिच्या घरी बोलावले. पीडिता चिमुकलीसह आरोपी महिलेच्या घरी जात असताना रस्त्यातच तिचा मित्र आर्दड भेटला. त्यानंतर ते सर्व जण जालना येथे गेले.

जालना बसस्थानकावर पीडितेला गणेशच्या हवाली करून ती महिला औरंगाबादला परतली. पीडिता आणि तिच्या मुलीला गणेश लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच त्याने मुलीला आणि तिला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर दोनदा अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीने त्याच्या अन्य एका मैत्रिणीला जालना बसस्थानकावर बोलावले. देऊळगावराजा जवळच्या एका गावात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीच्या गावी पीडितेला पाठविले. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर १ आॅक्टोबरला ते जालना येथे परतले.

तेथे आरोपी महिला आणि गणेश आर्दड उपस्थित होते. तेथे आरोपीने पीडितेचे मोबाईल छायाचित्र काढून कोणाला तरी फोन केला. त्यावेळी तिची पाच लाखांत विक्री करण्याची आरोपींमधील चर्चा तिने ऐकली. तेव्हा औरंगाबादेतील माहेरी मुलीला सोडून येते असा बहाणा तिने केला. ती १ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांत तक्रार नोंदविली. 

पीडितेला बेंगलोरला पाठविण्याची होती तयारीतुझ्यासाठी बेंगलोर येथे चांगले काम आहे, तेथे तुला आठ दिवस  राहावे लागेल, असे आरोपीने पीडितेला सांगितले. मात्र या कामात तुझी मुलगी आडकाठी ठरत असल्याने तिला कोणाकडे तरी ठेवावे लागेल असे तो म्हणाला. आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी मुलीला आई-बाबांकडे ठेवून परत येते, असे खोटे सांगून पीडिता औरंगाबादेत परतली. रात्री आई-वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा नोंद केला.

आरोपीला पोलीस कोठडीदरम्यान, आरोपी गणेश बालाजी आर्दड  याला बुधवारी (दि. ३ आॅक्टोबर) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए. राठोड यांनी ११ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.