शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बनावट जन्म दाखल्याच्या आधारे सैन्यात भरतीचा प्रयत्न; ६ तरुणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 18:46 IST

Indian Army, Aurangabad fraud यानंतरही ते जर हजर झाले नाही तर त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली जाणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देआरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत.त्यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले जाईल.

औरंगाबाद: भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी बनावट जन्म तारिखेचा दाखल सादर करणाऱ्या ६ तरुणांचा बनाव सैन्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी सैन्य दलातर्फे या तरुणांविरुध्द रविवारी  फसवणूकचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही फसवणूक २०१६ ते २०२० या कालावधीत झाली.

विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने,सिक्री), किरण कौतिकराव भाडगे (रा. वाकड) आणि अनिस अलाउद्दीन शेख (रा. माळी गल्ली,परभणी) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, दरवर्षी सैन्य भरती कार्यालयाकडून सैन्य भरतीचे आयोजन केले जाते. देशसेवा आणि शासकीय नोकरी मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणून लाखो तरुण सैन्यात दाखल होण्यासाठी प्रयत्न करतात. सैन्य दलात भरती होण्यासाठी वयाची अट आहे. वयोमर्यादा संपल्यावर सैन्य दलात दाखल होता येत नाही. सैन्य भरतीचे स्वप्न भंगू नये याकरिता अनेक तरुण जन्मतारखेत परस्पर बदल करून वयोमर्यादा संपल्यानंतरही भरती प्रक्रियेत सहभागी होतात. त्यांच्यापैकीच आरोपी तरुणांचा समावेश आहे. 

आरोपी तरुणांनी २०१६ ते २०२० या कालावधीत छावणीतील भारतीय सैन्य दलात भरतीसाठी लेखी आणि मैदानी चाचणी दिली होती. यात हे तरुण भरतीसाठी पात्र ठरल्यावर सैन्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या तरुणांनी सादर केलेल्या जन्म तारखेच्या दाखल्यातील जन्मतारीख बनावट असल्याचे दिसून आले. जन्मतारखेत फेरफार करून ते खरे असल्याचे भासवून ते त्यांनी सादर केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर आल्यावर छावणी येथील सैन्य भरती अधिकारी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (४०) यांनी याविषयी सोमवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत. 

आरोपींना नोटीस देऊन बोलावणार आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले जाईल. यानंतरही ते जर हजर झाले नाही तर त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली जाणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी