शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; कोरडे वस्तीत पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 17:50 IST

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे.

पैठण -  तालुक्यात शनिवारी विविध घटनेत पाच जणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाही तोच आज पुन्हा विहामांडवा येथे शेततळ्यात पोहत असताना जीवरक्षक दोर तुटल्याने बुडून चार विद्यार्थ्यांसह एका जणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विहामांडवा ता पैठण येथील कोरडे वस्तीतील एकाच कुटुंबातील हे पाच जण असल्याने या कुटुंबावर दु:खा चा डोंगर कोसळला आहे.मृत पावलेल्या पाच जणात बाप- लेक व दोन सख्खा भावाचा समावेश आहे. दोन दिवसात दहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने पैठण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लक्ष्मण निवृत्ती कोरडे (४२), वैभव रामनाथ कोरडे (१२), सार्थक लक्ष्मण कोरडे (९), समर्थ ज्ञानदेव कोरडे (७), अलंकार रामनाथ कोरडे (९) अशी आजच्या घटनेत बुडून मरण पावलेल्यांची नावे आहेत. यात लक्ष्मण कोरडे व त्यांचा मुलगा  सार्थक यांच्यासह वैभव व अलंकार कोरडे या दोन सख्खा भावांचा समावेश आहे.  दुपारच्या समयी ही दुर्देवी घटना घडल्याने वस्तीवरील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनेमुळे विहामांडवा परिसरात शोककळा पसरली.

आज दुपारी कोरडे वस्तीवरील लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी वस्तीवरील शेततळ्यात घेऊन गेले. दरम्यान, पोहताना बुडू नये म्हणून दोर शेततळ्यात सोडण्यात आली होती. सुरवातीला लक्ष्मण  कोरडे हे शेततळ्यात मुलांसोबत होते, मुलांना दोर धरूण पोहण्याच्या  सूचना दिल्यानंतर ते बाहेर आले. लक्ष्मण कोरडे बाहेर येताच काही वेळातच शेततळ्यात बांधलेला दोर तुटला व चारही मुले पाण्यात बुडू लागली यावेळी मुलांनी केलेला आरडाओरडा लक्ष्मण कोरडे यांच्या कानावर पडला त्यांनी धावत जात शेततळ्यात मुलांना वाचविण्यासाठी उडी मारली. परंतु, दोर तुटलेला असल्याने व शेततळे शेवाळलेले असल्याने त्यांनी मदतीसाठी धावा केला मात्र ऐकण्यासाठी कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, शेवटी पाचही जण पाण्यात बुडाले. घटना समताच सर्वांना पाचोड येथील रूग्णालयात हलविण्यात आले, मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.

पैठण तालुक्यात दोन दिवसात दहाजणांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याने तालुकाभर शोककळा पसरली आहे. या दहा पैकी सात जणांचा मृत्यू शेततळ्यात बुडून झाल्याने शेततळ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळ्यात बुडून दुर्घटना होऊ नये म्हणून उपाय योजना राबविणे काळाची गरज असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.  एकाच दिवशी खेळते बागडते चार बालके व एक तरूण गेल्याने कोरडे वस्ती सुन्न झाली आहे. बालकांच्या मातांनी केलेला आक्रोश हेलावून टाकणारा होता. दरम्यान विहामांडवा येथील नागरिकांनी वस्तीवरील नागरिकांना धीर दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी