शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पोस्टातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून चुलतभावाच्या खात्यातून काढले 4 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 13:24 IST

नावट बचत खाते पोस्टात उघडले आणि गोविंदांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग

ठळक मुद्देपोस्टातील अधिकारी सहभागी असल्याचे उघड  सिटीचौक ठाण्यात चौघांवर  फसवणुकीचा गुन्हा

औरंगाबाद : पोस्टमास्तरसह तेथील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून चुलत भावाच्या खात्यातील ४ लाख ३५ हजार ८००रुपये परस्पर काढून घेतल्याची माहिती समोर आली. ही फसवणूक ८ एप्रिल ते १९ ऑगस्ट दरम्यान जुनाबाजार येथील टपाल कार्यालयात झाली. 

तक्रारदाराचा चुलतभाऊ तुषार सुभाष दरक , टपाल कर्मचारी संजित  कुमार,  बोलकर आणि पोस्टमास्तर कोळी अशी आरोपींची नावे आहेत. सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, सिडको टाऊन सेंटर, लोकमतनगर येथील रहिवाशी गोविंद प्रकाश दरक यांचे जुना बाजार पोस्ट ऑफिस येथे बचत खाते आहे. या खात्यात त्यांनी ४ लाख ३५ हजार ८०० रुपये ठेवले होते. काही दिवसापूर्वी त्यांचे पासबुक हरवले होते. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे त्यांना टपाल कार्यालयाकडे जाता आले नव्हते. त्यांनी डुप्लिकेट पासबुक घेतले आणि तपासले असता त्यांच्या खात्यातील रक्कम आरोपी तुषार दरक याच्या खात्यावर वळविल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी पोस्ट अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

आरोपी तुषार दरक हा तक्रारदार  यांचा चुलत भाऊ आहे. गोविंद यांच्या खात्यात मोठी रक्कम असल्याचे तुषारला माहित होते. त्याने बनावट बचत खाते पोस्टात उघडले आणि गोविंदांच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करण्यास सांगितले. हे करताना आरोपींनी गोविंद यांच्या बनावट सह्या केल्या. ही बाब समोर आल्यानंतर गोविंद यांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. 

पोस्टाची विश्वासार्हताच पणालापोस्ट खात्याची एक विश्वासार्हता आहे. पोस्टातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून  आरोपीने भावाला फसविले असले तरी त्यामुळे पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना हा एक धक्का आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद