शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 19:32 IST

घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या देणे सुरूच

ठळक मुद्देगतआठवड्यात घाटी रुग्णालयाला हाफकिनकडून दीड ते दोन महिने पुरेल इतका औषधसाठा प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी घेऊन येण्यास सांगणे काही बंद झालेले नाही.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या लिहून देणे सुरूच आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी औषधाची चिठ्ठी घेऊन घाटी परिसरातील दुकानांवर गेल्यानंतर २४ औषधी गोळ्यांसाठी तब्बल २० हजार रुपये आकारण्यात येतात. त्याच गोळ्या दिवसा अवघ्या ४०० रुपयांत मिळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

घाटी रुग्णालयाला गेल्या दोन महिन्यांपासून औषधांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. हाफकिनकडून औषधींचा अत्यल्प पुरवठा होत आहे. गतआठवड्यात घाटी रुग्णालयाला हाफकिनकडून दीड ते दोन महिने पुरेल इतका औषधसाठा प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी घेऊन येण्यास सांगणे काही बंद झालेले नाही. ११ सप्टेंबर रोजी एका रुग्णाला घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्ण दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत डाॅक्टरांनी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची चिठ्ठी नातेवाइकांकडे दिली. एकूण २४ औषधी गोळ्यांची ती चिठ्ठी होती. ही चिठ्ठी घेऊन नातेवाईक रात्री घाटी परिसरातील औषधी दुकानावर गेले; परंतु दोन ते तीन दुकाने फिरल्यानंतरही ती औषधी मिळत नव्हती. अखेर एका औषधी दुकानात औषधी मिळतील, असे सांगण्यात आले. या औषधींची किमत ऐकून नातेवाइकांच्या पायाखालची वाळूच सरकली. या औषधींसाठी तब्बल २० हजार रुपये लागतील, असे दुकानदाराने सांगितले. सोबत एवढी रक्कम नसल्याने नातेवाईक माघारी परतले. दुसऱ्या दिवशी तीच औषधी अन्य मेडिकलमध्ये अवघ्या ४०० रुपयांत मिळाली.

सकाळी स्वस्तात मिळालीघाटी परिसरातील मेडिकल स्टोअरमध्ये रात्री औषधी गोळ्यांसाठी २० हजार रुपये सांगितले. एवढी मोठी रक्कम जवळ नसल्याने परत गेलो; परंतु तीच औषधी सकाळी फक्त ४०० रुपयांत मिळाली. घाटी रुग्णालयातूनच रुग्णांना औषधी मिळाली पाहिजे.- संजय जगदाळे

चौकशी केली जाईलसध्या कोविड आणि नाॅनकोविडची औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. औषधी चिठ्ठी का लिहून देण्यात आली, याची चौकशी केली जाईल.- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

हेही वाचा - जावयाचा प्रताप ! सासऱ्याकडून १० लाख उकळून पत्नीला दिले बनावट नियुक्तीपत्र

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर