शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून १६ ते १७ वर्षांच्या मुली लग्नाच्या आमिषाला पडतात बळी; सोडतात आईवडिलांचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 13:46 IST

crime news in Aurangabad, Missing Minor Girl : बेपत्ता अथवा घरातून निघून गेलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी देशभरात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसांत ८ बालकांचा शोध घरातून निघून गेलेल्या १२० मुला-मुलींना पोलिसांनी आणले परत

- बापू सोळुंके

औरंगाबाद: प्रेमप्रकरणातून १६ ते १७ वर्षांच्या मुली आईवडिलांचे घर सोडून प्रियकरासोबत निघून जातात तर आईवडील अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून १८ वर्षांखालील मुले घरातून पळून जातात. बेपत्ता अथवा घरातून निघून गेलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी देशभरात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. शहर पोलिसांनी पंधरा दिवसांत ८ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची पोलिसांनी दिली.

स्टोरी क्रमांक १ : अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून घर सोडलेआईवडील अभ्यासासाठी तगादा लावतात म्हणून, दहावीत शिकणारा रोहन (नाव बदलले) घर सोडून थेट रेल्वेने मुंबईला गेला. घराबाहेर पडताना त्याने घरातील १८ हजार रुपये नेले होते. जवळचे सर्व पैसे खर्च होईपर्यंत तो हॉटेलमध्ये राहिला. मात्र, पैसे संपताच त्याने त्याच परिसरातील एका हॉटेलमध्ये काम सुरू केले. औरंगाबाद सोडल्यापासून रोहनने ना घरी संपर्क साधला होता ना मित्रांना. सोबत तो त्याचे दप्तर आणि कपडे शाळेच्या बॅगेत घेऊन गेला होता. इकडे त्याचे आईवडील त्याच्या शोधार्थ खूप प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना यश येत नव्हते. मात्र, तो मुंबई पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. आणि त्याला परत आणण्यात पोलिसांना यश आले.

स्टोरी क्रमांक २ : दारुडा नवरा मारतो म्हणून आई पोटच्या मुलांकडून भीक मागून घेतेऑपरेशन मुस्कानअंतर्गत पोलिसांनी क्रांती चौकात भीक मागणाऱ्या ९ ते १० वर्षांच्या डॉलीला ताब्यात घेतले तेव्हा उड्डाणपुलाखाली बसलेली तिची आईच तिच्याकडून भीक मागायला लावत असल्याचे समजले. पोलिसांनी बालिकेच्या आईला गाठले तेव्हा तिने दिलेल्या माहितीनुसार, तिला चार मुले आहेत. बिडकीन येथे राहणारा तिचा पती कोणताही कामधंदा करीत नाही. उलट दारू पिऊन सतत मारहाण करतो. यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादला आली. सिग्नलवर मिळणाऱ्या भिकेवर पोट भरतो.

स्टोरी क्रमांक ३ : लग्नाच्या आमिषाने प्रियकरासोबत ठोकली धूमशहरातील रहिवासी १७ वर्षांची तरुणीने प्रेमप्रकरणात तिच्यापेक्षा पाच वर्षांने मोठा असलेल्या प्रियकराने दाखविलेल्या लग्नाच्या आमिषाला बळी पडून घर सोडले. आई कामावरुन घरी गेल्यावर ती घरी नसल्याचे पाहून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती दुचाकीस्वारासोबत स्वतःहून गेल्याचे समजले. पोलिसांनी तपास करून दोघांना पुण्यातून पकडून आणले. तेव्हा तिने दिलेल्या माहितीवरुन, तिच्या प्रियकरावर बाललैगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकले. ती मात्र आईकडे जाण्यास तयार नसल्यामुळे शेवटी तिला बालिका सुधारगृहात ठेवले.

पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत होतो तपासअल्पवयीन मुला-मुलींच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत या गुह्याचा तपास केला जातो. यावर्षी अकरा महिन्यांत ४२ मुले आणि ८४ मुली घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या. यापैकी ४२ मुले आणि ७८ मुलींचा शोध घेऊन त्यांना परत त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. उर्वरित ६ मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय ऑपरेशन मुस्कानअंतर्गत डिसेंबर महिन्यात भीक मागणारी मुले, हॉटेल, वीटभट्टी येथे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वाधीन केले जात आहे.- सुरेश वानखेडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.

औरंगाबाद शहरात अकरा महिन्यांत हरवलेली आणि शोधून आणलेली मुला- मुलींची आकडेवारी :

महिना-   मुले-मुली- सापडलेली मुले-मुलीजानेवारी- ११ --- ११फेब्रुवारी - १५ --- १३मार्च ----- १७ ----- १७एप्रिल ----- २ ------ २मे ------ ५------- ५जून --- १३ ----१३जुलै ------ १०-- १०ऑगस्ट ---१५ ---१३सप्टेंबर ---१५ ----- १५ऑक्टोबर --१५ ----१४नोव्हेंबर ------८ ---७ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंAurangabadऔरंगाबाद