शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! देशात प्रत्येक तासाला १२ मुलांचे अपहरण; बाल कल्याण समितीची माहिती

By राम शिनगारे | Updated: October 12, 2022 20:23 IST

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

औरंगाबाद : देशात प्रत्येक तासाला तब्बल १२ अल्पवयीन मुलांचे अपहरण (मिसिंग) होत असल्याची नोंद होते. प्रत्येक दिवसाचे हे प्रमाण २८८ एवढे अवाढव्य आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार २०२० या वर्षामध्ये तब्बल ६० हजार मुलांचे अपहरण झाले. त्यातील मोठ्या संख्येने मुलांचा शोध लागलेला नसल्याची धक्कादायक माहिती बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी कार्यशाळेत बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सुचनेनुसार शहर पोलीस आयुक्तालयाने 'बाल हक्क संरक्षण' विषयावर एमजीएममधील आर्यभट्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. आशा शेरखाने-कटके, महिला व बालविकास अधिकारी बी.एल. राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड.शेरखाने-कटके म्हणाल्या, आपल्या देशात मुले मिसिंग होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्याचवेळी अल्पवयीन मुलांना साबयर क्राईमचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात मोबाईलवरुन छेड काढणे, पाठलाग करणे, अश्लिल साहित्य पाठवणे असे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमांसह सायबर कायद्याचेही कलम लावावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नसल्याचेही ॲड.शेरखाने-कटके यांनी सांगितले.

अधीक्षक कलवानिया, राठोड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन ग्रामीण भरोसा सेलच्या सपोनि अर्चना पाटील यांनी तर आभार शहर भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी मानले. कार्यशाळेत शहर आणि ग्रामीण भागातील अंमलदार, अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेत यांनी केले मार्गदर्शनफॉरेन्सिक विभागाचे चरणसिंग कायटे यांनी बालक, महिलांविषयीच्या साबयर गुन्ह्यातील पुरावे गोळा करणे, ॲड. अनिता शिऊरकर यांनी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समितीचे कामकाज, डॉ. मनोहर बन्सवाल यांनी बाल संरक्षणात पोलिसांची भूमिका, प्रा. अपर्णा कोत्तापल्ले यांनी पोक्सो कायद्याचे महत्व, सरकारी अभियोक्त ॲड. देशपांडे यांनी बालकांच्या गुन्ह्यातील दोषसिद्धी वाढविणे, ॲड. सुप्रिया इंगळे यांनी जेजे ॲक्ट आणि बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांनी बाल विवाह कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद