शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 21:24 IST

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर शिवसेना ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. गेल्या काही काळापासून एक-एक करत उद्धव ठाकरेंचे शिलेदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. आधी कोकण आणि आता मराठवाड्यात ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

मराठवाड्यात ठाकरेंना धक्काविधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात पक्षात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. आता अखेर त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोपवला. विशेष म्हणजे, राजू शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरेंवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि आपल्या समर्थकांसह पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला.  

राजू शिंदेंनी पत्रात काय म्हटले?उद्धव ठाकरे आणि अबांदास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपण ही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजाी खासदार चंद्रकांत खैर साहेब यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्या सह शिवसेना पक्षाचा आणि विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो स्वीकारावा, असे राजू शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.

संजय शिरसाठांविरोधात 1 लाख मते मिळवलेली..राजू शिंदे यांनी ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेली होती. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना 1 लाख 6 हजार 147 मते पडली होती. तर, संजय शिरसाठ यांना 1 लाख 22 हजार 498 मतं मिळाली होती. दरम्यान, राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पण, अद्याप त्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरChandrakant Khaireचंद्रकांत खैरे