शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवतीर्थ! तरुणाईने चंग बांधला आणि 'या' गावात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 13:12 IST

गावातील तरुणांनी लोकसहभागातून २०१७ साली  छत्रपती शिवाजी महाराज यांचे या भव्य मंदिर उभारले.

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार हे गाव एकेकाळी हातभट्टीच्या दारूसाठी कुप्रसिद्ध होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून गावाची प्रतिमा अल्पावधीतच बदलली आहे. ग्रामस्थांनी चंग बांधत २०१७ साली येथे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आणि गावात आमुलाग्र बदल होते गेले. आता गाव व्यसनमुक्त होत असून गावाची ओळख शिवाजी महाराजांचे मंदिर असलेले गाव अशी झाल्याने ग्रामस्थांचा उर भरून येत आहे. 

पंचक्रोशीत सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार गाव हातभट्टी दारू विक्रेचे ठिकाण म्हणून हे गाव कुप्रसिध्द होते. ही प्रतिमा कायमची पुसली जावी म्हणून गावातील तरुणांनी लोकसहभागातून २०१७ साली  छत्रपती शिवाजी महाराज यांचे या भव्य मंदिर उभारले. छत्रपती शिवरायांचा आदर्श, त्यांच्या विचारांची जोपासना व्हावी, असा या मंदिर उभारणीमागील हेतू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जळकीबाजार गावाची ओळख शिवतीर्थ अशी झाली आहे.

ग्रामस्थांनी केले आमुलाग्र बदलजळकी बाजार येथील स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिले शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळी विधिवत पूजाअर्चा व आरती केली जातेय. गेली पाच वर्षे या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिवरायांचे विचार मनामनात बिंबविण्याचे कार्य सुरु येथे सुरु आहे. यातूनच गाव दारू मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिराच्या माध्यमातून गावातील व्यसनी व्यक्तीचा शोध घेत त्यांना व्यसन कायमचे सोडण्यासाठी प्रेरित केले. व्यसनी नागरिकाचे गाव असलेली ओळख मिटविण्यासाठी युवा वर्ग पुढे येऊन व्यसनमुक्तीचा संकल्प करीत असल्याचे चित्र आता गावात दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामस्थ आपल्या राजाच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करायला लागला आहे. 

ग्रंथालय, मुलींच्या कन्यादानासह अनेक उपक्रममंदिराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येथे गावातील विद्यार्थ्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठीही याठिकाणी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मंदिर समितीच्या माध्यमातुन दरवर्षी सहा मुलींचे कन्यादान करण्यात येते. शासकीय योजनांबाबत जनजागृती व्हावी,यासाठी व्यापक प्रयत्न मंदिर समितीच्यावतीने केले जातात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप ,दिनदर्शिका प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचे आयोजन मंदिर समितीमार्फत केले जाते. यामुळे आता गावाने कात टाकली असून जुनी ओळख पुसत शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज