शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने आजमावले स्वबळ; कोण लढणार, कोण पक्षातून जाणार याची केली चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:47 IST

देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद : देशातील एकूण राजकारण पाहता येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही निवडणुका होतील, असे बोलले जात आहे; परंतु माझे मत तसे नाही. माध्यमातही निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची तयारी पाहण्याच्या अनुषंगाने दोन दिवस मराठवाड्यातील संघटना व संघटनात्मक बैठक घेत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या बैठकीला काही लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबळ हे स्वबळावर लढण्याइतके  सक्षम आहे काय? पक्षाकडून लढणार, पक्षातून जाणार  कोण, याची चाचपणी ठाकरे यांनी केली.

सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, भाजपसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठरले आहे. इतर पक्षाची तयारी वेगाने सुरू आहे. निवडणुकीत कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. शिवाय नेत्यांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. संघटनेबाबत चर्चा केली, बैठक घेणे हा नवीन प्रकार नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलता आले, त्यांच्या सूचना व प्रश्न ऐकले. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मराठवाड्यानंतर इतर महाराष्ट्रातही बैठका घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील बैठकीत कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावा त्यांनी केला. 

कदम यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाहीपालकमंत्री म्हणून जर रामदास कदम असते तर कचराकोंडी झाली नसती. पक्षप्रमुखांना क्षमा मागण्याची वेळ आली नसती, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, कदम यांच्यावर दुसरी जबाबदारी दिली ती खैरेंच्या तक्रारींमुळे नाही. जेथे गरज असेल तेथे कदम पक्षासाठी काम करतात. त्यांनी आजवर यशच मिळवून दिले आहे. कदम औरंगाबाद सोडून कुठेही गेलेले नाहीत, ते येथेच बसलेले आहेत. त्यांच्या कचाट्यातून कुणी सुटणार नाही, असा सूचक टोला ठाकरे यांनी उपस्थिताना लगावला. डॉ.दीपक सावंत आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधातही खा.खैरेंनी तक्रारी केल्या होत्या. यावर ठाकरे म्हणाले, पालकमंत्री सावंत दुसऱ्या जिल्ह्यात होते. जिथे जिथे गरज असते तिथे ते जातात, त्यामुळे कुणातही वाद नाही, असे वाटते. 

शिस्त मोडून कुणी वागू शकत नाहीकन्नडचे आ.हर्षवर्धन जाधवांचा बंदोबस्त करणार की, तक्रार ज्यांच्या विरोधात त्यांचा बंदोबस्त करणार. यावर पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, बंदोबस्त हा शब्द आला कुठून. आ.जाधव यांनी माझ्याकडे काहीही तक्रार केली नाही. त्यांना मी पुन्हा भेटीला बोलावले आहे. त्यांनी जरी तक्रार केली असली तरी ते मला काहीही बोलले नाहीत. शिवसेना शिस्तबद्ध संघटना आहे. शिस्त मोडून कुणी वागू शकत नाही. खैरे व जाधव या दोघांमध्ये काही गैरसमज असतील तर दूर करू. ठाकरे यांनी जाधव यांना अल्टिमेटम दिले की, त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे, हे कळण्यास  मार्ग नाही.  

विमानाने फिरणारे; इमानाने वागणारेपक्षप्रमुख ठाकरे यांनी आ.संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे गुरुवारी सकाळी उद्घाटन केले. याप्रसंगी ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनी मोठे व्हावे, हीच भावना आहे. शिरसाट यांच्या कार्यालयात विमानाच्या प्रतिकृतीचे अ‍ॅण्टीचेंबर केले आहे. ते जरी विमानाने फिरणारे असले तरी ते इमानाने वागणारे आहेत. मागील वर्षी आ.शिरसाट हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या अनुषंगाने विमान आणि इमान यांची तुलना करणारे   मोजकेच शब्द शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढून सूचक इशारा दिला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदमHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव