शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 20:05 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारावजा सूचना

ठळक मुद्देऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

औरंगाबाद : शिवसेनेच्या सर्व मतदारांनी आदेशाचे पालन करायचे आहे. ‘व्हीप’ प्रमाणे मतदान करायचे आहे. आपल्यावर कुठलाही डाग लागता कामा नये. मुंबईतील निवडणुकीत सर्व सदस्यांना ताकीद दिली होती, तीच पद्धत येथे अवलंबिण्यात येईल, अशी इशारावजा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महायुतीच्या मेळाव्यात केली. 

अंबादास दानवे यांनी गुरुवारी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप नेते, पदाधिकारी, नगरसेवकांचा मेळावा सरस्वती भुवनच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, दानवे विजयी होतील, उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते. परंतु उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि दानवे यांची भेट घडवून आणली आहे. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवडणुकीत सर्व काही उघडपणे होते. त्यामुळे पक्ष आदेशानुसार मतदान करा. क्षुल्लक कारणासाठी स्वत:ला डाग लावून घेऊ नका. विधानसभेची ही रंगीत तालीम आहे. कुचराई होऊ देऊ नका, मतदान होईपर्यंत आपल्याच विभागात थांबा. राज्यमंत्री खोतकर, आ.दानवे म्हणाले, जालना जिल्ह्यातून उमेदवार दानवे यांना मोठ्या प्रमाणात मते मिळतील. यावेळी प्रदीप जैस्वाल, नरेंद्र त्रिवेदी, डॉ.भागवत कराड, किशनचंद तनवाणी, विनोद घोसाळकर, राजू वैद्य, शिरीष बोराळकर, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, अनिरुद्ध खोतकर, एकनाथ जाधव यांच्यासह औरंगाबाद-जालना महायुतीचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

( कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’)

दानवे गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसे नाहीतमाजी खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, माझ्यात आणि अंबादासमध्ये कोणतेही भांडण नाही. अभ्यासू कार्यकर्ता म्हणून मला त्याची गरज आहे. ही विधानसभेची रंगीत तालीम आहे. लोकसभेत अनेक जण पाणीपुरवठ्याच्या कारणावरून जलकुंभांवर चढले. आता पाणी नसताना कुणीही जलकुंभावर चढत नाही. या निवडणुकीत कुणीही कुठे जाणार नाही. १३ आॅगस्ट रोजी सर्वांना सहलीला जायचे आहे. अंबादास गरीब कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत. कुणीही काही अपेक्षा ठेवू नये. आम्ही आमच्या पातळीवर सर्व बघून घेऊ, असे खैरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादJalanaजालना