शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याबाबत सकारात्मक अहवालासाठी मारहाणीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 17:56 IST

Shiv Sena MP Bhavana Gawli : खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्दे शासनाला उत्तर दाखल करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळया प्रकरणी पुढील सुनावणी ३० ऑगस्टला होणार आहे

औरंगाबाद : वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावरील कोट्यवधीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत सकारात्मक अहवाल देण्यास नकार दिल्यामुळे औरंगाबादचे सनदी लेखापाल उपेंद्र गुणवंतराव मुळे यांना गुंडामार्फत मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने शासनास उत्तर दाखल करण्यासाठी २ ऑगस्‍ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी ४ आठवड्यांचा वेळ दिला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी ३० ऑगस्‍ट रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?खासदार भावना गवळी यांच्यावर सहकारी कारखाना विक्रीमध्ये कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी संबंधित सकारात्मक अहवाल तयार करुन देण्यासाठी गुंड सईद खानमार्फत दबाव टाकून मारहाण केल्याबाबत सनदी लेखापाल उपेंद्र मुळे (रा. दौलत बंगला, प्लॉट क्र. ६९, मुकुंद हाऊसिंग सोसायटी, महाजन कॉलनी, एन-२, सिडको, औरंगाबाद ) यांनी पोलीस ठाण्यात आणि औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर मुळे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी शपथपत्राव्‍दारे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला.

नागपूर खंडपीठात याचिकासनदी लेखापाल मुळे यांचे खासदार गवळी यांच्याशी २००८ पासून व्यावसायिक संबंध होते. दरम्यान, श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख हरीश सारडा यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात खासदार गवळी यांनी बेकायदेशीर आणि अवैध कागदपत्रे तयार करण्यासाठी मुळे यांना सप्टेंबर २०१९ मध्ये सांगितले होते. मात्र, मुळे यांनी बेकायदेशीर लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यास नकार दिला होता. तरीही खासदार गवळी यांनी मुळे यांच्यावर दबाव टाकून अहवाल बनविण्यासाठी गुंडांमार्फत धमक्या आणि मारहाण केल्याचाही प्रकार घडला होता. त्याविरोधात मुळे यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांच्याकडे खासदार गवळी यांच्यासह सईद खान व अन्य ५ ते ६ जणांविरुध्द तक्रार दिली होती. त्यानंतर खासदार गवळी यांनी हस्तकामार्फत मुळे यांच्याविरुध्द अपहाराचे ५ खोटे गुन्हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी दाखल केले. याशिवाय मुळे यांच्या घरी गुंड येऊन धमक्या देऊ लागल्यामुळे ते घर सोडून हॉटेलात राहू लागले होते. पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. मुळे यांच्या बाजूने अ‍ॅड. अमोल गांधी बाजू मांडत आहेत.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ