शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरातूनच तिकिटासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:23 IST

दबक्या आवाजातील सवाल, कार्यकर्त्यांनी काय जन्मभर सतरंज्या उचलायच्या का?

ठळक मुद्देचर्चा तर होणारच वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच घरात उमेदवारी रहावी यासाठी प्रयत्न केले जात असून, किमान १५ जागा या नेत्यांना हव्या असल्याची माहिती समोर येत आहे. नेत्यांच्या या प्रयत्नांमुळे सेनेतील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे. 

घरातील सदस्याबरोबरच काहींनी निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, आणि पदाधिकाऱ्यांच्याच घरात अधिक जागा जातील, अशी  चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात ३ जागा मिळाव्यात यासाठी तयारी सुरू आहे. यात चिरंजीव, पुतण्यासह अन्य एका कुटुंब सदस्याचा समावेश आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या घरातून मुलगा व नातलगातून एक, अशा दोघांना उमेदवारी हवी आहे.  आ. संजय शिरसाट यांनाही मुलगा आणि अन्य एक अशा दोन जागा हव्या आहेत. चिरंजीव आणि कन्या निवडणुकीच्या रणांगणात ते आणतील, अशी चर्चा आहे.

सभागृह नेते विकास जैन यांना स्वत:ला आणि पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांना तीन जागा हव्या आहेत. चिरंजीव, पत्नी आणि स्वत:साठी उमेदवारी मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे हे भावासाठी उमेदवारी मिळावी, या प्रयत्नात आहेत. राजू वैद्य हेही स्वत:सह आणखी एका समर्थकाला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. राजेंद्र जंजाळ स्वत:साठी किंवा पत्नीसाठी आणि त्र्यंबक तुपे हे स्वत:साठी पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निष्ठावान कायकर्ते तसेच विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना स्वत:ला, आईला उमेदवारी आहे. तसेच पत्नी, पती आणि चिरंजीवालादेखील उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. मनपातील एका ज्येष्ठ अभियंत्यांच्या भाच्याला उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनीही सेना नेत्यांमार्फत उमेदवारी मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा कानावर येत आहे. 

इच्छुकांच्या गुपचूप बैठका; मात्र युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही शिवसेनेकडून सध्या इच्छुकांच्या गुपचूप बैठका सुरू असून, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीचे निमंत्रणही नसते. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनादेखील इच्छुकांच्या बैठकीला निरोप दिला जात नाही, त्यांनाही नियमित बैठकीला बोलावले जात नाही. रचनेनंतर वॉर्डाची सीमा कुठून कुठपर्यंत आहे, याचीही माहिती अनेक इच्छुकांना नाही. त्यांना मात्र निरोप दिले जात आहेत, अशी ओरड सध्या सुरू आहे. बंडखोरी करणारे, पक्षकार्यात कोणतेही योगदान नसलेल्यांऐवजी निष्ठावानांना आतापासूनच डावलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी सतरंज्या उचलल्या, पक्षाचे काम केले, जे तरुणांचे युवक आणि युवकांचे प्रौढ झाले, त्यांचा विचार होण्याऐवजी नेत्यांच्या घरातच उमेदवारीच्या वाटाघाटी होत असतील तर कसे करायचे, यावर कार्यकर्ते चिंतन करू लागले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक