शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena-BJP tussle : जालना रोडवर उड्डाणपूल बांधण्यावरून शिवसेना-भाजपात ‘सोशल’ वॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 15:48 IST

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते.

ठळक मुद्देविमानतळासमोरचा पूल अमरप्रीत चौकात बांधण्याची भाजपाची मागणीशिवसेनेने आजवरच्या अपघाताचे दाखले देत पुलाची जागा योग्य म्हटले

औरंगाबाद: नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने जालना रोड पुनर्बांधणीच्या ४०० कोटींच्या मूळ प्रस्तावाला फाटा देत फक्त ७४ कोटींचा निधी दिला असून त्यातून जालना रोडच्या साईडड्रेनसह उड्डाणपुलांचे काम करण्यात येणार आहे. विमानतळासमोर उड्डाणपूल प्रस्तावित असून तो पूल अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात बांधण्याची गरज आहे. यासाठी सोशल मीडियातून भाजपानेच विरोध सुरू केला आहे. त्यात शिवसेनेने उडी घेत विमानतळासमोरच पूल बांधणे गरजेचे असल्याचे सांगून आजवरच्या अपघाताचे दाखले सोशल मीडियातून दिले आहेत.

गेल्यावर्षी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर जालना रोडवरील उड्डाणपूल विमानतळासमोर ऐवजी अमरप्रीत चौकात बांधण्याचे ठरले होते. क्रांतीचौक येथील उड्डाणपुलाला जोडून मोंढा नाक्यापर्यंत नवीन पूल ‘लँड’ करण्याचा निर्णय झाला होता. परंतु अमरप्रीत चौकात पूल बांधणे शक्य नाही. तेथे अंडरग्राऊंडला जलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. ते जाळे विस्कळीत झाल्यास ५० वसाहतींच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होईल. अमरप्रीत चौकात होणारा पूल तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित असेल की नाही, याबाबत एनएचएआयच्या यंत्रणेला साशंकता होती. त्यामुळे पूल पुन्हा विमानतळासमोरच बांधण्याचे निश्चित झाल्याचे एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

विमानतळासमोरील पूल का केला होता रद्दविमानतळासमोर जास्त वाहतूक नसते असा अहवाल वाहतूक पोलिसांनी दिला होता. अमरप्रीत चौकात बीडबायपास, दर्गा रोडवरून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तेथे पूल प्रस्तावित करण्याबाबत तत्कालीन प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी विभागीय बैठकीत सांगितले होते.

भाजपाचा विरोध असाभाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत देसरडा यांनी सोशल मीडियातून विमानतळासमोरील पुलाला विरोध केला आहे. वाहतुकीचा विचार करता अमरप्रीत किंवा आकाशवाणी चौकात हा पूल बांधण्यात यावा. विमानतळासमोर पुलाची गरज नसून नागरिकांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रकरणी देसरडा यांनी सांगितले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या पूल बांधणे शक्य आहे.

शिवसेनेने दिलेले उत्तर असेशिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे यांनी सोशल मीडियातूनच विमानतळापासून रामनगरपर्यंत किती अपघात झाले आहेत, वाहतूक किती आहे याचे दाखले दिले आहेत. केंद्रात सरकार भाजपाचे आहे, त्यामुळे भाजपाने शहरासाठी आणखी दोन पुलांसाठी निधी आणावा असे आव्हानही दिले आहे. विमानतळासमोरील पुलाचे लोकेशन आता पुन्हा बदलले तर या भागातील सर्व वॉर्डातील नागरिकांसह आंदोलन उभारण्याचा इशारा गांगवे यांनी दिला..

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादBJPभाजपा