विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठ आणि खान्देशातील तीन अशा ११ जिल्ह्यांतील ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामे ज्या कंत्राटदारांनी केलेली आहेत, त्या सर्व कामांची चिरफाड करण्याची मोहीम कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी हाती घेण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथील ट्रान्स्फार्मर आणि विद्युत खांबांच्या पायाभरणीपासूनची कामे बकोरिया यांनी गेल्या आठवड्यात तपासल्यानंतर ती कामे निकृष्ट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून मराठवाडा आणि खान्देश मिळून ११ जिल्ह्यांतील कामांची काय अवस्था असेल, याचा अंदाज त्यांनी बांधला आहे.
मराठवाड्यातील‘इन्फ्रा’च्या कामांची होणार चिरफाड
By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST