शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार जणांचे व-हाड जाणार शिर्डीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:42 IST

शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे.

विजय सरवदेऔरंगाबाद : शुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्चून राज्य परिवहन मंडळाच्या ८० बसेस आरक्षित केल्या आहेत.

शुक्रवारी श्रीसाई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आहे. या कार्यक्रमाचा मुहूर्त साधून राज्य सरकारने शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घरकुलांच्या ई- प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले आहे. राज्य सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी दिसली पाहिजे म्हणून की काय, प्रत्येक जिल्ह्यातून पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारी पैशातून नेले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार घरकुलांचे लाभार्थी व त्यांच्यासोबत प्रत्येकी एक नातेवाईक असे एकूण ४ हजार जणांना शिर्डीला नेण्यासाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

शिर्डीला नेण्यात येणारे २ हजार लाभार्थी व त्यांचे २ हजार नातेवाईक, अशा ४ हजार नागरिकांच्या प्रवासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ८० बसेस आरक्षित केल्या आहेत. बस व नाश्ता-पाण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून निधीदेखील प्राप्त झाला आहे. प्रती बस १५ हजार रुपयांप्रमाणे ८० बसेससाठी १२ लाख रुपये व सरकारी वºहाडाच्या नाश्ता- पाण्यासाठी वेगळा निधी मिळाला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच परिवहन मंडळाच्या बसेस तालुका तसेच मोठ्या गावांमध्ये दाखल होतील. तेथून शिर्डीला नेण्यात येणारे लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांना बसमध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंते व अन्य सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या उपक्रमावर गटविकास अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणार आहे.

जिल्ह्यात सहा हजार घरकुले पूर्णयासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेला सन २०१६-१७ पासून प्रारंभ झाला. सन २०२२ पर्यंत २१ हजार ३०६ घरकुले उभारली जाणार आहेत. तीन वर्षांत १० हजार २०५ घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, आजपर्यंत ६ हजार १९२ घरकुले पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. घरकुल उभारण्यासाठी प्रती लाभार्थी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान टप्प्या टप्प्याने दिले जाते.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद