शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिर्डीत विमान कंपन्या वेटिंगवर; औरंगाबादमध्ये करावी लागते प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:36 IST

याठिकाणी १२ विमानांची ये-जा होत आहे

औरंगाबाद : राज्य आणि केंद्र शासनाकडून झुकते माप मिळाल्याने अवघ्या दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या शिर्डी विमानतळावर विमानांची गर्दी वाढली आहे. याठिकाणी १२ विमानांची ये-जा होत असून, अनेक कंपन्या विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, आता मर्यादित सेवांमुळे कंपन्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे औरंगाबादहून नव्या विमानसेवांची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

शिर्डी विमानतळाचे १ आॅक्टोबर २०१७ रोजी उद्घाटन झाले होते़ उद्घाटनानंतर मुंबई व हैदराबाद सेवा नियमित सुरू झाली़ अवघ्या दीड वर्षातच शिर्डी विमानतळावर विमानसेवेचा विस्तार झाला. याठिकाणी १२ विमानांचे उड्डाण होत आहे. यामध्ये ९ विमानांचे दररोज उड्डाण होत आहे. एअर इंडिया, स्पाईस जेट, अलायन्स एअर या कंपन्यांमुळे दिल्ली, मुंबई, चेन्नई, भोपाळ, हैदराबाद, बंगळुरू शहरांबरोबर शिर्डी जोडले गेले आहे. याठिकाणी इंडिगो, गो एअरसारख्या कंपन्या सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत; परंतु त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

सोयी-सुविधांचा विस्तार करून शिर्डीहून यापुढेही आणखी इतर ठिकाणांसाठी सेवा सुरूहोतील. मात्र, शिर्डी विमानतळाचा औरंगाबाद विमानतळास निश्चित फटका बसत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले, तरीही येथील प्रशासन जागे होण्यास तयार नाही. जेट एअरवेज बंद झाल्याने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एअर इंडिया आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा उरलीआहे. त्यामुळे औरंगाबादेतील पर्यटन, उद्योग, व्यवसायावर परिणाम होत आहे. औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आता ठोस प्रयत्नांची गरज आहे, अन्यथा औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.

क्षमता आणखी वाढविणारशिर्डी विमानतळावरून १२ विमानांचे उड्डाण होत आहे. यात दररोज ९ विमानांची ये-जा होते. सध्याचे टर्मिनल छोटे आहे. त्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत मोठे टर्मिनल होईल. नाईट लँडिंग सुविधाही सुरू होईल. त्यातून २४ तास सेवा देता येईल. इतर कंपन्यांकडून विचारणा होत आहे; परंतु सध्या सेवा मर्यादित ठेवली आहे. क्षमता वाढून सेवेचा आणखी विस्तार केला जाईल. - दीपक शास्त्री,संचालक, शिर्डी विमानतळ 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद