शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'मी नाही, माझे कार्यकर्ते लढणार' म्हणणारे शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ स्वतःही रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:26 IST

शिंदेसेनेतील अंतर्गत नाराजी एका दिवसांत अखेर दूर; माघार घेणारे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शेवटच्या दिवशी दाखल केला अर्ज

छत्रपती संभाजीनगर: महायुतीमधील जागावाटपाच्या तिढ्यावरून ढसाढसा रडणारे आणि उमेदवारी नाकारणारे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सोमवारी "कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर मी लढणार नाही," असे म्हणत निवडणुकीतून माघार घेणाऱ्या जंजाळ यांनी आज मंगळवारी (३० डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "पदाधिकाऱ्यांना न्याय मिळाला आहे, त्यामुळे माझी नाराजी दूर झाली," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय होता पेच? जागावाटपात शिंदेसेनेच्या ७ विद्यमान नगरसेवकांच्या जागा भाजपला सोडल्या जात असल्याने जंजाळ अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. या घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर रात्री शिरसाट यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांच्यासह जमून जंजाळ यांनी जागा वाटपावर रोष व्यक्त केला, मात्र, सकाळी राजकीय हालचालींना वेग आला आणि शिंदेसेना आणि भाजप यांची युती फिस्कटली. त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

कार्यकर्त्यांचा आग्रह, म्हणून लढतोयआज अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जंजाळ म्हणाले, "माझी लढाई स्वतःसाठी नव्हती, तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी होती. आता माझ्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळाली आहे. तसेच कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता की मी स्वतःही निवडणूक लढवावी, त्यांच्या प्रेमापोटी मी हा अर्ज भरला आहे." दरम्यान, आज अर्ज छाननीनंतर किती उमेदवार राहतात हे स्पष्ट होईल.

रडलेल्या घुले यांना मिळाले तिकीटमहापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे शिंदेसेनेच्या महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शारदा घुले या सोमवारी मध्यवर्ती कार्यालयात ढसाढसा रडल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी पक्षाचे 'एबी' फॉर्म मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. पाहायला मिळाला. प्रभाग - ८ मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

English
हिंदी सारांश
Web Title : U-Turn: Shinde's Rajendra Janjal, who said workers will fight, contests election!

Web Summary : Rajendra Janjal, initially reluctant due to seat allocation disputes and shedding tears, filed his nomination after party leaders and workers urged him. He emphasized his fight was for his workers, whose interests are now secured.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Shiv Senaशिवसेना