छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९९ उमेदवार मैदानात उतरविले. यात तीन माजी महापौर आणि २० हून अधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी शिंदेसेनेने तब्बल दहा दिवस दहा बैठका घेतल्या. मात्र, भाजप ३७ जागा देत होता. भाजप अधिक जागा देण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी भाजप आणि शिंदेसेना यांच्यामधील युती तुटली. यानंतर शिंदेसेनेने तब्बल ९९ उमेदवारांना पक्षाचे बी फॉर्म वाटप केले. युती झाली असती तर ६३ पदाधिकाऱ्यांना तिकीट मिळाले नसते. स्वतंत्र निवडणूक लढवत असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व ९९ उमेदवारांना बी फॉर्म देऊ शकलो, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.
३ माजी महापौरांसह २० माजी नगरसेवक९९ जणांच्या उमेदवारांच्या यादीत माजी महापौर अनिता घोडेले, त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह २० माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली.
नेत्यांच्या मुलांना उमेदवारीपालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा, मुलगा सिद्धांत यांना तसेच आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश यांना पक्षाने उमेदवारी दिली.
Web Summary : Shinde Sena nominated 99 candidates in Chhatrapati Sambhajinagar, including three former mayors and over 20 ex-corporators. This follows the breakdown of alliance talks with BJP over seat sharing. Leaders' children also received nominations as the party decided to contest independently.
Web Summary : शिंदे सेना ने छत्रपति संभाजीनगर में 99 उम्मीदवारों को मैदान में उतारा, जिनमें तीन पूर्व महापौर और 20 से अधिक पूर्व नगरसेवक शामिल हैं। भाजपा के साथ गठबंधन वार्ता विफल होने के बाद यह निर्णय लिया गया। नेताओं के बच्चों को भी टिकट दिया गया है क्योंकि पार्टी स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेगी।