शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

३७ कोटींच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात ७ वर्षांत थेंबभरही पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:28 IST

वरदान नव्हे शाप : ४० गावांचा घसा कोरडाच

विनोद जाधवलासूर स्टेशन : शेतकऱ्यांना शाप, तर पुढाºयांना वरदान ठरत असलेल्या ३७ कोटी रुपये किंमतीच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात गेल्या सात वर्षांत एक टक्काही पाणी आलेले नाही. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी संबंधित विभागाने इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.गंगापूर -लासूर स्टेशन रस्त्यावर असलेला शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्प आतापर्यंत तरी परिसराला पांढरा हत्तीच ठरला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाची मूळ जागा बदलण्यात आल्याची चर्चा आहे. राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याने ३७ कोटी रुपये खर्चून देखील हा प्रकल्प लाभ क्षेत्रातील सिंचन व्यवस्था तर सोडाच परंतु ग्रामस्थांची तहान देखील भागवू शकलेला नाही.शिरेगाव, देवळीचे पुनर्वसन करून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्या गावात प्रकल्प झाला त्याच गावाची तहान गेल्या सात वर्षांपासून टँकरने भागविली जात आहे. त्यावरून या प्रकल्पाचे अपयश सातत्याने उघडे पडत आहे. असे असतानाही संबंधित विभाग या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.पुढाºयांकडून आश्वासनांची खैरातया प्रकल्पात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देण्याची संधी या प्रकल्पामुळे प्रत्येक निवडणुकीच्या काळात पुढाºयांना मिळत आहे. परंतु परिसरातील तीस ते चाळीस गावातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या अपयशामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण खर्च व्यर्थप्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च व्यर्थ ठरत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे दुष्काळ निवारण समितीचे तालुका अध्यक्ष दत्ता कºहाळे यांनी सांगितले. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी असले पाहिजे, असे शिवसेनेचे प्रशांत बनसोड यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटला नाही. तर शेतीसाठी लागणारे पाणी तर अशक्यच गोष्ट आहे. पावसाच्या पाण्यावर न भरणाºया या प्रकल्पात शिवना नदीतून तात्काळ पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुनर्वसित शिरेगावचे उपसरपंच नितीन कºहाळे यांनी सांगितले.२००९ ते २०१८ मधील पाणी परिस्थितीवर्षे पाणी साठा२००९ १८.०८ %२०१० ७०.८७ %२०११ २९.०० %२०१२ ० %२०१३ ० %२०१४ ० %२०१५ ० %२०१६ ० %२०१७ ० %२०१८ ० %

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात