शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जगण्यानेच नव्हे तर मरणानेही तिला छळले...; कुटुंबीयांनी पाठ फिरवल्याने १८ तासांनंतर महिलेवर अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:09 IST

मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअंत्यविधीसाठी पैसे मागितल्याने मृतदेह पुन्हा घाटीतरुग्णवाहिका, खड्डे खोदणे यासाठी २,५०५ रुपये मोजावेच लागले.

औरंगाबाद : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’, सुरेश भटांची जगण्यातील छळवाद मांडणारी ही कविताही काहीशी खोटी ठरल्याचा प्रत्यय सोमवारी सामाजिक कार्यकर्त्यांना आला. घाटीत मृत्यू पावलेल्या महिलेच्या अंत्यविधीसाठीही तिची मुले आली नाहीत, तर बेवारस म्हणून अंत्यविधी करताना पैसे उकळण्याच्या प्रकाराने स्मशानभूमीतून मृतदेह पुन्हा घाटीत न्यावा लागला. शेवटी १८ तासांनंतर पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. 

सिल्लोड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सुमनबाई मारुती बनारसे ही महिला सिल्लोड येथे सरकारी रुग्णालयाबाहेर आढळली होती. माणुसकी समूहाच्या मदतीने तिला घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दि. २७ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेतला; परंतु तिच्या मुलांनी आम्ही येऊ शकत नाही, असे सांगितले. मनपाने बचत गटाला अंत्यविधीचे काम सोपविले. पोलीस हेड काँस्टेबल आर. के. वर्पे यांनी फोनवर त्यांच्याशी संपर्क केला. ग्रामीण भागातील मृतदेह आहे. त्यामुळे ३ हजार रुपये लागतील, असे त्यांना गटातर्फे सांगण्यात आले. ही रक्कम कशी द्यायची, असा प्रश्न पोलिसांना पडला.

तेव्हा माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी स्वत: अंत्यविधी करण्याचे ठरविले. ५ रुपये शुल्क देऊन सदरील स्मशानभूमीची परवानगी घेतली; परंतु स्मशानात गेल्यानंतर तुम्ही अंत्यविधी करू शकत नाही, असे बचत गटाच्या लोकांनी म्हणत विरोध केला. माणुसकी समूहाने खड्डा खोदायला सुरुवात केली; पण बचत गटाच्या लोकांनी फावडे हिसकावून घेतले. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीतून पुन्हा घाटीत नेण्यात आला. सदरील घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सोमवारी दुपारी १२.३० वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. 

आई मृत्यू पावल्याचे सांगितले सदर मयत महिला ही सिल्लोडमध्ये एकटीच राहत होती. चौकशी, माहितीवरून एका कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली, तेव्हा या कुटुंबातील मुलांनी सदर महिला ही आपली आई नाही, आपली आई अडीच वर्षांपूर्वीच वारल्याचे सांगितले. इतर कोणी नातेवाईकही सापडले नाहीत. नातेवाईक शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; परंतु कोणीही मिळाले नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. -आर. के. वर्पे, पोलीस हेडकान्स्टेबल, सिल्लोड

...यामुळे करावे लागते दफनअशा मृत्यूच्या घटनांनंतर अनेकदा कायदेशीर बाबी, वाद उद्भवण्याची शक्यता असते. नातेवाईक समोर येऊन मृत्यूविषयी आरोप- प्रत्यारोप होतात. त्यामुळे मृतदेह दफन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले

रुग्णवाहिका, खड्डे खोदण्यासाठी पैसेरुग्णवाहिका, खड्डे खोदणे यासाठी २,५०५ रुपये मोजावेच लागले. यासाठी सिल्लोडचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, बेगमपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पो. हे. कॉ. आर. के. वर्पे, पोलीस नाईक श्याम जाधव, अमोल ढाकरे, दिगंबर सोनटक्के, सुमित पंडित आदींनी मदतकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू