शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

ती म्हणतेय हा माझा पती, तो म्हणतोय ही उचापती...; दोघांच्या एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:09 IST

पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने ती आपली पत्नीच नसून तिनेच खोटे दस्तावेज तयार करून पती म्हणून लोकांना सांगत माझी फसवणूक सुरू केल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे. त्यावरून पुंडलिकनगर पोलिसांनी सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

औरंगाबाद : पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने ती आपली पत्नीच नसून तिनेच खोटे दस्तावेज तयार करून पती म्हणून लोकांना सांगत माझी फसवणूक सुरू केल्याची तक्रार पोलिसांना दिली आहे. त्यावरून पुंडलिकनगर पोलिसांनी सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तिच्याशी आपला कायदेशीर अथवा रीतीरिवाजानुसार विवाह झालेला नाही; परंतु तिने तिच्या नावासमोर पती म्हणून माझे नाव लावत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेत खातेसुद्धा उघडल्याचे तक्रारदार अजय चैनसिंग राजपूत (रा. एस.टी. कॉलनी, गजानननगर) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ती अजय माझा पती असल्याचे सर्वत्र सांगत बदनामी करते, असेही तक्रारीत नमूद केले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला सीमा (नाव बदलले) हे ऐकमेकांच्या परिचयाचे आहेत. २०११ ते २०१२ दरम्यान तिने ही सर्व कागदपत्रे बनविली आहेत. पोलीस उपनिरीक्षक कापसे तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक एल. ए. सिनगारे यांनी सांगितले की, तक्रारदार आणि आरोपी महिला यांच्यात जुना वाद आहे.या वादातून महिलेच्या तक्रारीवरून यापूर्वी अजयविरोधात छळाचा गुन्हा नोंद आहे. काल प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी सुरू असूून, तक्रारीत तथ्य आढळल्यास आरोपीला अटक केली जाईल.