शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण आला अन् सण झाले गोळा

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

यशवंत परांडकर, नांदेड श्रावण महिन्यास प्रारंभ झाला की, अनेक सण गोळा होतात.

यशवंत परांडकर, नांदेडश्रावण महिन्यास प्रारंभ झाला की, अनेक सण गोळा होतात. विशेष करुन महादेवाची आराधना या महिन्यात केली जाते. निमित्ताने श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध बाजारपेठेत विक्रेत्यांनी बेल व विविध फुलांची दुकाने थाटलेली दिसून आली.श्रावण हा पाचवा आणि पाचूसारखा हिरवागार महिना. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असते म्हणून श्रावण हे नाव. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. क्षणात सूर्यकिरणे धरणीवर अवतरतात, तर दुसऱ्याच क्षणी घननिळा बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. ऊन-पावसाचा विलोभनीय लपंडाव या दिवसांत अनुभवायला मिळतो. श्रावण जलबिंदूच्या माध्यमातून सूर्याच्या सप्तरंगांचे मनोहारी दर्शन घडवितो. या महिन्यातील सोमवारी एक वेळ जेऊन शिवव्रत करतात. मंगळवारी नवविवाहिता मंगळागौरीची पूजा करतात, तर भाविक स्त्रिया शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करतात, हळदी-कुंकू देतात. रविवारी आदित्याची म्हणजेच सूर्याची पूजा करतात. श्रावण महिना अनेक व्रतवैकल्ये आणि सणांनी सजलेला आहे. नागपंचमी साजरी होते, नारळी पौर्णिमेला कोळी बांधव नदी वा समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. याच दिवशी बहीण भावाला राखी बांधून हे पवित्र नाते अधिक घट्ट करते. श्रीकृष्णाचा जन्मदिवस कृष्णाष्टमीला आणि नवमीला गोपाळकाला हा दहीहंडी उत्सव साजरा होतो. श्रावणी आमावास्येला बैलपोळ्याचा सण (पिठोरी) साजरा होतो. चातुर्मासातील सर्वांत श्रेष्ठ मास म्हणून श्रावण महिन्याचे महत्त्व आहे. पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात. शहरातील वजिराबाद, कलामंदिर, भाग्यनगर, आनंदनगर, वर्कशॉप, तरोडा खुर्द-बुद्रुक, श्रीनगर, शिवाजीनगर आदी ठिकाणी बेल, फुले घेताना भाविकांची वर्दळ दिसून आली. दरम्यान, श्रीनगर भागातील केळी विक्रेते संग्राम कांबळे यांनी सांगितले की, आजपासून श्रावण महिना सुरु झाला असून अनेक भाविक उपवासासाठी केळीची मागणी करतात. सध्या ३० ते ४० रुपये प्रति डझनप्रमाणे केळी विकली जात आहे.