शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 14:19 IST

खा. तारिक अन्वर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. 

ठळक मुद्देक्लीन चिट देऊन मोकळे होण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतात राफेल घोटाळ्याप्रकरणी जेपीसीची मागणी पवार यांनी केली आहे.

औरंगाबाद : राफेल घोटाळ्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही. खा. तारिक अन्वर यांनी गैरसमजातून राजीनामा दिलेला दिसतो. त्यांची आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले. 

शुक्रवारी सायंकाळी ते ताज हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काहीही झाले की, क्लीन चिट देऊन मोकळे होण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांनी सांगितले की, राफेल घोटाळ्याप्रकरणी जेपीसीची मागणी पवार यांनी केली आहे. याचा अर्थ याबाबतीत त्यांनी अपत्यक्षरीत्या शंका व्यक्त केली आहे. मग चौकशी होणार ती पंतप्रधानांची! राज्यातील आगामी राजकीय चित्र काय राहील, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, राष्ट्रवादीतील आपले स्थान, मुख्यमंत्रीपदासाठी ओबीसी चेहरा या प्रश्नांना भुजबळ यांनी बगल दिली.   विधानसभा निवडणुकांच्या वेळी काय होतं ते बघू. एवढेच ते म्हणाले. 

शनिवारी भुजबळ यांच्या उपस्थितीत बीड येथे समता मेळावा होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांचे औरंगाबादेत आगमन झाले व रात्री ते एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले. ‘मराठा आरक्षणाबाबत आपले मत काय, असे विचारता ‘ते उद्या’ असे म्हणत भुजबळ उठले. 

राष्ट्रवादीने फिरविली पाठ....छगन भुजबळ यांच्या आगमनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कानाडोळा केल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा व शहराचा एकही पदाधिकारी वा प्रमुख कार्यकर्ता विमानतळावर दिसला नाही. गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील व कदीर मौलाना हे मात्र विमानतळावर दिसले.  छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतानाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का नव्हते, हा चर्चेचा विषय बनला आहे. समता परिषदेचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यातून आलेले दिसले. 

वाहन रॅलीने स्वागत.... तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळ हे प्रथमच औरंगाबादेत आले. त्यामुळे त्यांचे विशेषत: समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मोठ्या वाहन रॅलीने त्यांन विमानतळ ते ताज हॉटेलपर्यंत आणण्यात आले. विमानतळाच्या बाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली, तसेच ताज हॉटेलच्या बाहेरही. समता परिषदेचे नाव असलेले तिरंगी झेंडे वाहनांवर फडकत होते व जोरदार नारेबाजीही केली जात होती. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील