शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे सुपुत्र किरण थोरात यांना भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:51 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद सैनिक किरण थोरात यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील शहीद जवान किरण थोरात यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. मूळगावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मिरात पूंछ व राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी भारतीय चाैक्यांवर गोळीबार केला. यात वैजापूर तालुक्यातील फरीदाबाद येथील रहिवासी जवान किरण थोरात यांना वीरमरण आले.   

शहीद किरण पोपटराव थोरात यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (13 एप्रिल) सकाळी 11.30 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीतील हजारोंच्या समुदायाने ''किरणभाऊ अमर रहे'', अशी घोषणा करताच फकिराबादवाडी गहिवरून गेली. पाकिस्तानच्या गोळीबारात किरण थोरात यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथून मूळगावी फकिराबादवाडीत आणण्यात आले. यावेळी शहीद किरण थोरात यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तरूण मंडळींसहीत आबालवृद्धांनी गर्दी केली होती. म्हसोबा चौक येथून शहीद किरण थोरात यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ''किरण थोरात अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय'' या घोषणांनी आसमंत व्यापून गेला. तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा धिक्कार केला. 

त्यानंतर किरण थोरात यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी शहीद जवानाच्या आई, पत्नीने हंबरडा फोडताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले. अंत्यदर्शनानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी, आईवडील, पत्नी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. भाऊ अमोल थोरात यांनी शहीद किरण थोरात यांना मुखाग्नी दिला. शहीद किरण थोरात यांना जिल्हा तालुक्यासह पंचक्रोशीतून आलेल्या नागरिकांनी अखेरचा निरोप दिला.

किरण थोरात यांंच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक दोन वर्षांची मुलगी आहे. त्याआधी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने पूंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले होते. 

किरण थोरात यांच्याविषयीची माहितीकिरण यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण लाडगाव (ता. वैजापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात घेतले. 2 मार्च 2013 रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते सैन्यदलात भरती झाले. वडिलांची बुलेटची इच्छा केली पूर्ण  वडिलांना बुलेट गाडी घेऊन देण्याचे किरण थोरात यांचे सैन्यात भरती झाल्यापासूनचे स्वप्न होते. दोन महिन्यांपूर्वी सुटीवर आले असताना ते त्यांनी पूर्ण केले. वडिलांना काहीही न सांगता त्यांना औरंगाबादला नेले. तेथील शोरूममधून नवीन बुलेट गाडी घेऊन ती वडिलांना ‘गिफ्ट’ दिली होती.

 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान