शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने विधवेशी शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत, पीडितेची तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार

By बापू सोळुंके | Updated: May 7, 2023 14:54 IST

Crime News: इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल अडिच वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दुसरीसोबत लग्न करणाऱ्या तरूणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

- बापू सोळुंके

छत्रपती संभाजीनगर - इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तब्बल अडिच वर्ष तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दुसरीसोबत लग्न करणाऱ्या तरूणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरेापीचा शोध सुरू केला आहे.

शोएब शेख बाबू (२४,रा. नारेगाव )असे आरोपीचे नाव आहे. याघटनेविषयी प्राप्त माहिती अशी की,  शहरातील रहिवासी २७ वर्षीय विधवा पिडिता दोन मुलांसह राहते. इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर दोघांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री होऊन भेटीगाठी झाल्या. तेव्हा शोएबने तिच्यासोबत लग्न करून तिच्या दोन्ही मुलांना आधार देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. गेल्या काही दिवसांपासून तो तिला भेटत नव्हता. एवढेच नव्हे तर तो तिचे फोनही घेत नव्हता. शोएब तिच्यापेक्षा वयाने चार वर्ष लहान आहे. यामुळे त्याची अडचण काय आहे, समजून घेण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. मात्र त्याने तिच्याशी संपर्क तोडल्याचे वागणे तिला खटकल्याने तिने त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याने नुकताच दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केल्याचे तक्रारदार यांना समजले. आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी ६ मे रोजी सिडको पोलीस ठाण्यात शोएबविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी