उस्मानाबाद : अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खामसवाडी (ताक़ळंब) येथील ६० वर्षाच्या वृध्दास उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस़ आय़ पठाण यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी दिलेली माहिती अशी की, खामसवाडी येथील सुधाकर संदीपान शेळके या इसमाने १९ मार्च २०१४ रोजी त्याच्या घरी टीव्ही पाहण्यास आलेल्या दोन अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात (गुरनं २३/२०१४) गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाचा सपोनि एस़डीक़ोकणे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ याप्रकरणाची सुनवाई उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस़आय़पठाण यांच्यासमोर झाली़ त्यावेळी समोर आलेले पुरावे, तपासाधिकारी एस़ डी़ कोकणे यांच्यासह इतर साक्षीदारांच्या साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़ वाय़ जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सुधाकर संदीपान शेळके यास भादंवि कलम ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास आणखी एक वर्षे सक्तमजुरी, भादंवि कलम ३७७ अन्वये दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिन्याची सक्तमजुरी, तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम ४ प्रमाणे दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, दंड न दिल्यास अणखी एक वर्षे सक्तमजुरी, सदर कायद्याच्या कलम ८ प्रमाणे दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच सदर कायद्याच्या कलम १२ प्रमाणे दोषी धरून १ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न दिल्यास अणखी सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली़ (प्रतिनिधी)
लैंगिक छळ; वृद्धास सक्तमजुरी
By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST