औरंगाबाद : शहरातील अनेक भागांमध्ये आज पाण्याचा ठणठणाट होता. काल १ आॅक्टोबर रोजी ५ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ५६ एमएलडीच्या ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी ३० ते ३५ वॉर्डांमध्ये आज कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, तर काही ठिकाणी पाणीच आले नाही. सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जलवाहिनीमध्ये उच्चदाबाने पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे १ आॅक्टोबरच्या सायंकाळचे आणि रात्रीच्या टप्प्यातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. दरम्यान, नागरिकांना महागडे टँकर्स घ्यावे लागले. अनेक भागांमध्ये खाजगी टँकरचालकांकडून पाणीपुरवठा झाला. १५ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. पालिकेने आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या गळत्यांची डागडुजी करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आठ दिवस नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली.
शहरात अनेक भागांमध्ये निर्जळी
By admin | Updated: October 3, 2014 00:38 IST