शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील मेडिकलच्या ७ विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:45 IST

जात वैधता दाखले उशिरा दिल्याचे प्रकरण

ठळक मुद्देऔरंगाबाद खंडपीठाने जातवैधता तत्काळ देण्याचा दिला होता आदेशहायकोर्टाच्या आदेशाने रद्द झालेले प्रवेश पुन्हा मिळाले  आणखी ६० विद्यार्थी टांगणीला

औरंगाबाद : अनुसूचित जमातींच्या राखीव कोट्यातून यंदा ‘एमबीबीएस’ वैद्यकीय अभ्यासक्रमास हंगामी प्रवेश दिलेल्या सात विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता दाखले मुदत संपून गेल्यावर एक दिवस उशिराने सादर केले असले तरी त्यांचे प्रवेश रद्द न करता ते कायम करावेत, असा आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना बुधवारी मोठा दिलासा दिला. हे सातही विद्यार्थी मराठवाड्यातील असून, त्यांना हा दिलासा मिळाला नसता, तर त्यांचे मिळालेले प्रवेश एक तर रद्द झाले असते किंवा त्यांना सर्वसाधारण प्रवर्गात दामदुप्पट फी भरून प्रवेश घ्यावा लागला असता.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालामुळे ज्या विद्यार्थ्यांवर, त्यांची काहीही चूक नसताना होणारा अन्याय दूर झाला, त्यात वैष्णवी रघुनाथराव चंचलवार, सूचिता दत्ता सुरेवाड  व ऋतुजा रमण मिटके (तिघीही जि. नांदेड), अनिकेत कुमार विभूते (बीड), गायत्री कौतिक चांडोल (जालना), मयुरी पंडित ढोणे (उस्मानाबाद) आणि ऋषिकेश तात्याराव कानले (परभणी) यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी विविध आदिवासी जमातींचे असून, त्यांची जातवैधता प्रकरणे जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असल्याने वैधता दाखले नंतर देण्याच्या अटीवर त्यांना राखीव जागांवर हंगामी प्रवेश देण्यात आले होते.  जातवैधता दाखले सादर करण्याची अंतिम मुदत १९ जुलै रोजी सायं. ५ वाजेपर्यंत होती व तोपर्यंत दाखला सादर न केल्यास हंगामी प्रवेश रद्द मानले जातील, अशी नियमात तरतूद होती.

या सातही जणांनी वैधता दाखले मिळावेत यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केल्या होत्या. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १९ जुलै रोजीच न्या. एस.व्ही. गंगापूरवाल व न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने त्या याचिकांवर निकाल दिला व या सर्वांना जातवैधता दाखले ‘तात्काळ’ देण्याचा आदेश दिला. असा आदेश असूनही जात पडताळणी समितीने त्यांना वैधता दाखले दुसऱ्या दिवशी २० जुलै रोजी दिले. या विद्यार्थ्यांनी ते दाखले सादर केले; पण आता मुदत टळून गेली आहे. तुमचे हंगामी प्रवेश रद्द झाले आहेत, असे त्यांना प्रवेश देणाऱ्या ‘सीईटी’ प्राधिकाऱ्यांनी सांगितले. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या या विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता उच्च न्यायालयात मुंबईतच याचिका दाखल केल्या. न्यायालयानेही निकड लक्षात घेऊन लगेच सुनावणी घेऊन तात्काळ निकाल दिला.

आता मुदत संपून गेली आहे. त्यामुळे आता जातवैधता दाखले स्वीकारताही येणार नाहीत व त्याआधारे रद्द झालेले प्रवेशही पुनरुज्जीवित होणार नाहीत, असे ‘सीईटी’ प्राधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, ते फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, या सातही जणांना तात्काळ वैधता दाखले द्या, असे औरंगाबाद खंडपीठाने १९ जुलै रोजी सांगितले तेव्हाच त्यांच्या जातीवर शिक्कामोर्तब झाले होते. तो आदेश झाला तेव्हा ‘सीईटी’ प्राधिकराणाचे अधिकारी व वकीलही हजर होते. समितीने ‘तात्काळ’ असे सांगूनही प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी वैधता दाखले दिले यात या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही. त्यामुळे त्यांचे राखीव कोट्यातील हंगामी प्रवेश कायम करावेच लागतील.

याच खंडपीठाने ऐश्वर्या चंद्रशेखर ठाकूर (शिरपूर, धुळे) या विद्याथिर्नीच्या प्रकरणातही असाच आदेश सोमवारी दिला होता. या सुनावणीत याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅड. रामचंद्र मेंदाडकर, अ‍ॅड. चिंतामणी भाणगोजी व अ‍ॅड. प्रियांका शॉ यांनी, तर ‘सीईटी’ प्राधिकाऱ्यांसाठी अ‍ॅड. एस.एस. पटवर्धन यांनी काम पाहिले.

आणखी ६० विद्यार्थी टांगणीला‘सीईटी’ प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. आनंद रायते हेही सुनावणीच्या वेळी जातीने हजर होते. वैधता दाखले उशिरा देऊनही या विद्यार्थ्यांचे हंगामी प्रवेश कायम केले, तर अशीच मागणी, इतरही विद्यार्थी करतील. यांच्याखेरीज असे उशिरा दाखले आणून देणारे आणखी ६० विद्यार्थी आहेत, असे डॉ. रायते यांनी न्यायालयास सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी सांगितले की, ज्यांच्या प्रकरणात न्यायालयाचे आदेश मुदत संपायच्या आधी झाले होते अशांचे प्रवेश कायम करा, असे आम्ही सांगत आहोत. उशिरा आलेल्या इतरांचे काय करायचे, हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीयMarathwadaमराठवाडाcollegeमहाविद्यालय