शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात ७ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 20:21 IST

खरीप हंगामातील मागील दोन महिन्यांत मराठवाड्यात ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

औरंगाबाद : खरीप हंगामातील मागील दोन महिन्यांत मराठवाड्यात ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही ७ लाख ३० हजार ९९ हेक्टर क्षेत्र पेरणीविना खाली आहे. हिंगोलीला मागे टाकत बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात ९३.३५ टक्के पेरणी करून अव्वल स्थान मिळविले आहे. 

मराठवाड्यात आतापर्यंत ३७.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पाऊस ४९.३ टक्के हिंगोली जिल्ह्यात पडला आहे. त्याखालोखाल नांदेड ४४.८ टक्के, लातूर ४०.७ टक्के, परभणी ३५.१ टक्के, उस्मानाबाद ३४.९ टक्के, जालना ३२.८ टक्के, बीड २९.४ टक्के व सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात २५.९ टक्के एवढा झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ६३.१५ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यात ७५.५२ टक्के पेरणी करून हिंगोली जिल्हा आघाडीवर होता, पण चालू पंधरवड्यात बीड जिल्ह्याने हिंगोलीला मागे टाकत ९२.२५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण केल्या आहेत. 

९०.६३ टक्के पेरण्या पूर्ण करून नांदेड जिल्हा नंबर दोनवर राहिला. लातूर ९०.३५ टक्के पेरणी करून तिसऱ्या स्थानी आहे. मागील पंधरवड्यात हिंगोली जिल्ह्यातील पेरणीची गती मंदावल्याने तो ८९.३२ टक्के पेरण्या करून चौथ्या स्थानावर राहिला. त्यापाठोपाठ उस्मानाबाद ८७.८९ टक्के, औरंगाबाद ८५.४१ टक्के, जालना ७९.५५ टक्के, परभणीने ८२.४८ टक्के क्षेत्रावर पेरणी केली. पेरणीत सर्वात मागे परभणी जिल्हा आहे. मराठवाड्यात ४१ लाख ८० हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात १३ लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. कपाशीचे एकूण क्षेत्राच्या ३ लाख ६४ हजार ३०० हेक्टर क्षेत्र अजूनही लागवडीपासून खाली आहे. सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रापैकी १६ लाख ८८ हजार ९०० हेक्टरवर (१६२.५६ टक्के) झाली. मराठवाड्यात कपाशीपेक्षा सोयाबीनची पेरणी अधिक झाली आहे. मूग ९५.४५ टक्के, मका ८५.८४ टक्के तर उडदाची पेरणी ८०.६२ टक्के झाली आहे.

...तर दुबार पेरणीचे संकट औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना आता जोरदार पावसाची आवश्यकता असून, येथील काही तालुक्यांत येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर कोरडवाहू शेतीत दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. 

कपाशीचे क्षेत्र घटलेमराठवाड्यात १७ लाख १७ हजार ४०० हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र, मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेक आणि यंदा मध्यंतरीच्या काळात पावसाने मारलेली दडी, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलीच नाही. त्यामुळे केवळ १३लाख ५३ हजार १०० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.  १५ आॅगस्टपर्यंत बाजरी, तूर, मक्याची मिश्र पेरणी होऊ शकते किंवा शेतकरी रबी ज्वारीची पेरणी करतील. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarathwadaमराठवाडा