जालना : शहरातील अनधिकृत सतरा धार्मिक स्थळे हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या दृष्टीने नगरपालिकेने तयारी केली आहे. यासाठी नगर पालिकेने मोठा पोलीस बंदोबस्ताची मागणी केली असून, अधिकारी व पोलीस कर्मचारी असा १०४ जणांचा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात येणार आहे. दोन आरसीपीच्या प्लॅटूनचाही समोवश आहे.शहरात नगर पालिकेच्या सर्वेक्षणानंतर शहरात १७ धार्मिक स्थळे अनधिकृत निघाली. या स्थळांना नोटिसा व सूचना देऊन सदर स्थळे हटविण्यात आली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. जालना शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक बैठक घेऊन कारवाईचा निर्णय होणार आहे.
‘ती’ धार्मिक स्थळे हटविण्यासाठी बंदोबस्त
By admin | Updated: December 25, 2016 00:06 IST