शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

जमावाविरुद्ध गंभीर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:45 IST

मुले पळविणारे समजून बहुरुप्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिसांनी सुमारे १२५ जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. या मारहाणीची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्याआधारे पोलिसांनी संशयितांंचा शोध सुरू केला.

ठळक मुद्देबहुरुप्यांना मारहाण : पडेगावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुले पळविणारे समजून बहुरुप्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिसांनी सुमारे १२५ जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. या मारहाणीची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्याआधारे पोलिसांनी संशयितांंचा शोध सुरू केला.विविध रूपे धारण करून सामान्यांचे मनोरंजन करण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेले काही बहुरूपी हर्सूल सावंगी येथे दोन वर्षांपासून राहतात. नेहमीप्रमाणे विक्रमनाथ भाटी आणि मोहननाथ सोडा यांनी शुक्रवारी सकाळी लैला-मजनूचा पेहराव केला (मोहननाथने पंजाबी ड्रेस घातला) आणि ते भिक्षा मागण्यासाठी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा येथे गेले. तेथील चार पाच घरांतील लोकांकडून त्यांना पाच दहा रुपयेही मिळाले. मात्र अचानक एका टोळक्याने त्यांना घेरले आणि ‘तुम चोर होे,’असे म्हणून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. नंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सुमारे शंभर ते दीडशे लोकांनी त्यांना घेरून मारहाण करण्यास सुरुवात केली. काठी, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जमाव त्यांना तुडवत होता. ही बाब पोलिसांना कळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन एकनाथ शिंदेसह अन्य कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून दोघांची सुटका केली. यावेळी जमावाने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी शिंदे यांनी विक्रमनाथ यांचा जबाब नोंदविला. छावणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जमावातील सुमारे १२५ जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगल करणे, बहुरुप्यांचा रस्ता अडविणे आणि मारहाण केल्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.मुकुंदवाडीतही महिलेला मारहाणमुकुंदवाडी, संजयनगरात शुक्रवारी रात्री एकटी फिरत असलेल्या ३० वर्षीय महिलेला मुले पळविणारी समजून लोकांनी मारहाण करून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. ती महिला नारळीबागेतील रहिवासी असून, मनोरुग्ण आहे. तिच्यावर घाटी आणि येरवडा येथील मानसोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. वेड्याचा झटका आल्यानंतर ती अशीच अधूनमधून घरातून एकटीच बाहेर पडते, अशी माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली. तिला सावित्रीबाई फुले महिला सुधारगृहात ठेवले होते. नंतर तिचे नातेवाईक मिळाल्याने त्यांच्या ताब्यात तिला देण्यात आल्याचे पो. नि. जाधव म्हणाले.सरसकट कोणतीही पोस्ट शेअर करू नकाऔरंगाबाद शहरात कोणत्याही ठिकाणी मुले पळविणारी टोळी आलेली नाही. काही समाजकंटक अफवा पसरवून समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर सायबर क्राईम सेल, गुन्हे शाखा आणि विविध ठाण्यांच्या पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. अफवांच्या पोस्ट टाकू नका आणि इतरांना फॉरवर्ड करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.असुरक्षिततेच्या भावनांमुळे आक्रमकतालहान मुले आणि महिलांच्या बाबतीत पुरुष मंडळी अतिसंवेदनशील असतात. यामुळेच अशा अफवांवर ते सहज विश्वास ठेवतात. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांकडे थोड्या फार प्रमाणात असलेला पैसा ते गमावू इच्छित नाहीत, यामुळे ते चोरांच्या अफवेवर विश्वास ठेवतात. पूर्वी अफवा ऐकायला येत. आता मात्र व्हॉटस्अ‍ॅपवरून फिरणारे व्हिडिओ आणि पोस्ट त्यांना दिसतात. त्या पोस्ट खºयाच असल्याचे समजून लोक संशयिताना मारहाण करतात.- डॉ.मेहराज कादरी, मनोविकार तज्ज्ञ