शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी २५ हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपीक रंगेहात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:03 IST

 तक्रारदार यांनी बदली मिळावी, याकरीता कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देपैसे दिले तरच हवी तेथे बदली मिळेल

औरंगाबाद: बदली अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करून इच्छित ठिकाणी बदली करुन देण्यासाठी सहकर्मचाऱ्याकडून २५ हजार रुपये लाच घेताना मृद व जलसंधारण विभागाच्या(वाल्मी)वरिष्ठ लिपिकाला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले.  २५ फेब्रुवारी रोजी वाल्मी संस्थेत ही कारवाई करण्यात आली.

सतीश लक्ष्मणराव मुळे (वय ४९)असे अटके तील लाचखोर लिपीकाचे नाव आहे. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार हे मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आहेत. या विभागाचे वाल्मी हे मुख्यालय आहे. तर आरोपी हा वाल्मीमध्ये वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहे.  तक्रारदार यांनी बदली मिळावी, याकरीता कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज वरिष्ठांकडे तात्काळ सादर करावा, याकरीता तक्रारदार हे  वरिष्ठ लिपीक मुळे यांना भेटले होते. तेव्हा मुळे यांनी  बदली अर्ज वरिष्ठांकडे सादर करुन  इच्छित ठिकाणी बदली करुन देतो, असे सांगितले. बदलीच्या कामासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. पैसे दिले तरच हवी तेथे बदली मिळेल असे स्पष्टपणे बजावले.  

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार , उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे कर्मचारी भिमराज जिवडे, संतोष जोशी, कपील गाडेकर यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा वरिष्ठ लिपीक मुळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मुळे यांनी सांगितल्यानुसार तक्रारदार हे लाचेची रक्कम घेऊन मंगळवारी दुपारी वाल्मी संस्थेत गेले. तत्पूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तेथे सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी सतीश मुळे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी मुळेविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचारArrestअटक