शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन

By राम शिनगारे | Updated: May 2, 2024 13:25 IST

चार जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर होणार मूल्यांकन

छत्रपती संभाजीनगर : पदवी परीक्षा अंतिम टप्प्यात असून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करण्यात आले. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिलपासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना २ एप्रिल, तर नियमित परीक्षांना १६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम- २०१६ मधील तरतुदीनुसार सर्व अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत जाहीर करणे बंधनकारक आहे. निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय १६ मूल्यांकन केंद्रे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ८ मूल्यांकन केंद्रे निश्चित केली आहेत. 

विद्यापीठ प्रशासनामार्फत सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना व प्राचार्यांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही बरेचसे शिक्षक मूल्यांकन केंद्रावर रुजू होत नसल्याची माहिती विद्यापीठास मिळाली आहे. त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. याच बाबीची गंभीर दखल घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती परीक्षेसाठी सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ८ एप्रिलपासून ज्या विषयाच्या परीक्षा संपतील, त्या-त्या विषयाच्या शिक्षकांना त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना पूर्णवेळ १५ दिवसांकरिता मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी कार्यमुक्त करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.

अहवाल विद्यापीठास पाठवाप्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना मूल्यांकनासाठी कार्यमुक्त केल्यानंतर मूल्यांकन केंद्रांनी शिक्षक कर्मचारी रूजू झाल्याबाबतचा अहवाल त्याच दिवशी विद्यापीठास सादर करावा. सदरील बाब विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तरपत्रिका मूल्यांकन पारदर्शीपणे करण्याबात सहकार्य करावे असेही पत्रकात म्हटले आहे.

निकालासाठी सहकार्य कराउत्तरपत्रिका मूल्यांकनाची सर्व संलग्नित महाविद्यालये तसेच विद्यापीठाची सामूहिक जबाबदारी व कर्तव्य आहे. उन्हाळी परीक्षांचे सर्वांच्या सहकार्याने विहित वेळेत मूल्यांकन करण्यात येऊन ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिकरीत्या सहकार्य करावे.- डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाEducationशिक्षण