लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नंदुरबार जिह्याच्या शहादा येथील देहव्यापार प्रकरणातील १६ अल्पवयीन मुलींना हजर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे व न्या. ए. एम. ढवळे यांनी दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने या पीडितांना मुक्त करण्यात आले होते. शहादा शहरातील नव्या भाजीमार्केट परिसरात देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे १० जानेवारी रोजी दोनदा छापे टाकून पोलिसांनी ६१ जणींना शहादा पोलिसांनी ताब्यात घेतले होत़े त्यापैकी १८ मुली अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले होत़े पुणे येथील रेस्क्यू फाऊंडेशनच्या मदतीने केलेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी प्रकरणात महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १५ अन्वये तर इतरांवर पिटा व पोस्का कायद्यान्वये कारवाई केली.
‘त्या’ सोळा मुलींना हजर करा - हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 03:45 IST