शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरच्या जोरदार प्रचारात सेना-भाजपला कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 18:52 IST

निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देआचारसंहिता कक्ष दखल घेणार का ?कार्यकर्त्यांनी मास्कचासुद्धा वापर केला नाही.

औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना- भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहरात राजकीय मिळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यामध्ये राजकीय पक्षांकडून कोरोनाच्या नियमांची एैशीतैसी करण्यात येत आहे. या प्रकाराबद्दल महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष याची उचित दखल घेईल, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी आहे. महाआघाडी  उमेदवारांच्या प्रचारार्थ  दोन दिवसांपूर्वी  मुख्यमंत्र्यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  औरंगाबाद शहरातील  कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन केले. एका हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी महाआघाडीतील  कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. याच मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. तापडिया नाट्यमंदिर पूर्णपणे भरले होते. व्यासपीठावरदेखील कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांची गर्दी होती. विशेष बाब म्हणजे कार्यकर्त्यांनी मास्कचासुद्धा वापर केला नाही. यासंदर्भात लोकमत वृत्तपत्र समूहाने कोरोना नियमांची राजकीय पक्षांकडून कशा पद्धतीने एैशीतैसी करण्यात येत आहे, यावर छायाचित्रांसह प्रकाश टाकला होता. याची गंभीर दखल मंगळवारी महापालिका प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतली. त्यांनी उघडपणे नाराजीही दर्शविली. 

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना अशी गर्दी योग्य नाही, असे ते म्हणाले. बिहारच्या निवडणुकीत प्रचार सभा, बैठकांमधून अशीच गर्दी होत होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने तेथे सुमारे १५० गुन्हे दाखल केले. तापडिया नाट्यमंदिरातील भाजप मेळाव्यात झालेली गर्दी, मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन सभेचीदेखील निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता कक्ष योग्य दखल, घेईल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या