फोटो क्रमांक- डॉ.संजय सांभाळकर
-------------------------
रांजणगावात पडोस युवा कार्यक्रम
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंह महाविद्यालयात बुधवारी (दि.३) ‘पडोस युवा’ कार्यक्रम घेण्यात आला. नेहरू युवा केंद्र व विश्व युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हर्षित हरकल, तर प्रमुख पाहुणे म्हणून वामकृष्ण बिडाईत, कवी अविनाश सोनटक्के, प्रा.संजय काळे, प्रकाश त्रिभुवन आदी उपस्थित होते.
----------------------------
बजाजनगरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट
वाळूज महानगर : बजाजनगरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या कामगार वसाहतीत मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. नागरी वसाहतीमध्ये जनावरांचा मुक्त संचार सुरू असून, घरासमोरील उद्यान व झाडाची मोकाट जनावरांकडून नासधूस केली जात असल्याची ओरड नागरिकांतून केली जात आहे.
-------------------------------
शिक्षक कॉलनीत लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या
वाळूज महानगर : रांजणगावातील शिक्षक कॉलनीत लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कॉलनीत विद्युत खांबावरील तारा ठिकठिकाणी लोंकळल्या आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे घराच्या छतावर जाण्यास नागरिक धजावत नाहीत. महावितरणकडून या लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
-----------------------
बजाजनगरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
वाळूज महानगर : बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक परिसरात सेफ्टी टँक चोकअप झाल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, नागरिक व व्यावसायिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून सेफ्टी टँकच्या दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
----