शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रत्नाकर गुट्टेसह आरोपींची मालमत्ता जप्त करा -खंडपीठाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:34 IST

उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि.चे रत्नाकर गुट्टे व इतर आरोपींची मालमत्ता जप्त का केली नाही, याचा लेखी खुलासा करा अथवा त्यांची मालमत्ता जप्त करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी १० जून २०१९ रोजी होणार आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे ‘पीक कर्ज ’ परस्पर उचलल्याचे प्रकरण

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि.चे रत्नाकर गुट्टे व इतर आरोपींची मालमत्ता जप्त का केली नाही, याचा लेखी खुलासा करा अथवा त्यांची मालमत्ता जप्त करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी १० जून २०१९ रोजी होणार आहे.गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि. कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या अपरोक्ष त्यांच्या नावावर ३२८ कोटी रुपयांचे ‘पीक कर्ज’ परस्पर उचलल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने ३ आॅगस्ट २०१७ आणि १५ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशांची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे खंडपीठाने आता पुन्हा वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि. कारखान्याने नागपूर व इतर शहरांमधील आंध्र बँक, ईको बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, सिंडीकेट बँक आणि रत्नाकर बँकेमधून शेतकºयांच्या नावावर परस्पर ३२८ कोटींचे पीक कर्ज उचलल्यासंदर्भात गंगाखेड येथील गिरीधर सोळंके व इतर ६ शेतकºयांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही.त्यामुळे संबंधितांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने राज्यातील आर्थिक गुन्हे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी यासंदर्भात चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश २३ जून २०१७ ला दिला होता. त्यानुसार नांदेडचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी तपास करून दोन वेळा खंडपीठात अहवाल सादर केला होता. त्यावरून खंडपीठाने ३ आॅगस्ट २०१७ आणि १५ सप्टेंबर २०१७ रोजी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली नाही.दरम्यान राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला. २ वर्षे काहीही प्रगती झाली नसल्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा नवीन याचिका दाखल केली असता आरोपींना अटक न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत खंडपीठाने तपास अधिकाºयांना म्हणणे दाखल करण्याचे तोंडी निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी मुख्य शेतकी अधिकारी नंदकिशोर शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीराम अंभोरे आणि ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना २० फेब्रुवारी २०१९ ला अटक केली, तर मुख्य आरोपी रत्नाकर गुट्टे आणि लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना अटक न करता ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (अ) नुसार नोटीस देऊन न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. दरम्यान पोलिसांनी २६ मार्च २०१९ रोजी गंगाखेडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.याचिकाकर्त्यांसह ज्या शेतकºयांच्या नावे पीक कर्ज उचलले होते त्यांना ऋण वसुली न्यायाधिकरणाच्या (डीआरटी) नोटिसा आल्यानंतर याचिकाकर्त्यांनी पुन्हा खंडपीठात धाव घेऊन वरील सर्व बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच खंडपीठाच्या २३ जून २०१७ च्या आदेशाप्रमाणे स्वतंत्र अधिकाºयांमार्फत पुढील तपास करण्याची आणि आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्याची विनंती केली असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रल्हाद बचाटे, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने