शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कैलास लेणी पाहताच जेफ बेजोस यांनी उच्चारले... ‘ओह अमेझिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 08:41 IST

सामान्य पर्यटकांसारखा वावर : जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉन कंपनीच्या संस्थापकांची वेरूळ लेणीला भेट

नजीर शेख/रमेश माळी

औरंगाबाद/वेरुळ : आॅनलाईन शॉपिंगमधील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’चे संस्थापक आणि सीईओ जेफरी प्रेस्टन बेजोस उर्फ जेफ बेजोस यांनी शनिवारी दुपारी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या पाहिल्या. कैलास लेणी पाहताच त्यांच्या तोंडून ‘ओह अमेझिंग’ असे शब्द उमटले.जेफ बेजोस हे सुमारे दोन तास वेरूळ येथील लेण्या पाहण्यात दंग होऊन गेले होते. खाकी रंगाची बर्म्युडा आणि पांढरा शर्ट या पेहरावातील बेजोस हे खास वेरूळ लेण्या पाहण्यासाठीच आले होते. या भेटीत बेजोस यांनी सर्वसाधारण पर्यटकांप्रमाणे लेणी पाहण्याचा आनंद लुटला. त्यांनी वेरूळ येथील १०, १५, १६ (कैलास लेणी) आणि ३२ क्रमांकाची लेण्या पाहिल्या. त्यांच्यासोबत अतिविशेष किंवा इतर अशी कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. त्यांच्यासमवेत काही सुरक्षारक्षक मात्र होते. ते वेरूळ येथे येत असल्याबाबतचा कुठला प्रोटोकॉलही नव्हता. इतर पर्यटकांप्रमाणेच त्यांनी लेण्या पाहिल्या. ते आणि त्यांचे कुटुंबिय बराच वेळ फोटो काढण्यातच दंग होते. त्यांना लेण्यांबाबत माहिती देण्यासाठी अलीम कादरी हे गाईड होते. जेफ बेजोस यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मॅकेंझी टटल तीन मुले व एक मुलगी असा परिवार होता. त्यांचा सहायक असलेला तरुणही सतत त्यांच्या मागे-पुढे आणि समवेत चालताना दिसला. काही वेळा लेणी पाहण्यासाठी आलेले इतर पर्यटक त्यांच्या अगदी जवळूनही गेले. सुरक्षा रक्षकांमुळे ते ‘व्हीआयपी’ पाहुणे असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येत होते. मात्र त्यांच्या सर्वसामान्यांप्रमाणेच वावरण्यामुळे त्यांनी इतरांना प्रभावित केले. यावेळी त्यांनी काही पर्यटकांशी संवादही साधला. दुपारी दोन वाजता लेण्यांमध्ये पोहोचलेल्या बेजोस आणि त्यांच्या फॅमिलीने ४.३० वाजता लेणी सोडली.

२० वर्षांपूर्वीही आले होतेजेफ बेजोस यांच्याबाबतीत आणखी एक माहिती मिळाली की, सुमारे २० वर्षांपूर्वी ते वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ते एकटेच आले होते आणि अर्थातच त्यांची अ‍ॅमेझॉन कंपनीही नव्हती. वीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या वेरूळच्या आठवणी त्यांनी शनिवारच्या भेटीत पुन्हा जागविल्या.

लेणींचा केला अभ्याससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेफ बेजोस यांनी लेणींना भेट देण्यापूर्वी या लेण्यांचा अभ्यास केला. त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले आणि नंतर त्यांनी लेणींना भेट दिली. ते मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी लेणी पाहताना अधिक भाष्य केले नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावर त्यांनी भर दिला.

दोन दिवसांपूर्वी रेकीजेफ बेजोस यांच्या वतीने त्यांच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेने दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळ, वेरूळ लेणी परिसराची रेकी केली होती. आपत्कालीन परिस्थितीत जर एखाद्या हॉस्पिटलची गरज पडलीच, तर त्यासाठीही शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (घाटी)सह दोन खाजगी हॉस्पिटल्सची सुरक्षा यंत्रणेने पाहणी केली होती.

 

जेफ बेजोस यांचे पाच तास..शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी जेफ बेजोस औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावर त्यांच्या खाजगी आणि आलिशान विमानाने आले.१.०५ वा. - वेरुळला जाण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दोन आलिशान वाहनांमध्ये बसले.२.०५- वेरुळ लेणी येथे पोहोचले.४.३० - वेरुळ लेणीहून औरंगाबाद विमानतळाकडे निघाले.५. ४० वा. - औरंगाबाद विमानतळावर आगमन.६.०० वा. - खाजगी विमानाने वाराणसीकडे रवाना.

टॅग्स :Aurangabad caveऔरंगाबाद लेणी