शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

सुरक्षेवरून अधिकाऱ्यांना झाप-झाप झापले

By admin | Updated: July 3, 2016 00:33 IST

लातूर : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर

लातूर : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी स्टींग आॅपरेशनच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल प्रादेशिक परिवहन अधिकारी पी़जी़ भालेराव यांनी घेतली़ ‘लोकमत’चे स्टींग गांभीर्याने घ्या़ उद्या कोणीही येईल, कार्यालयात घुसेल, तुमच्या खुर्चीत बसेल, आरटीओंच्या खुर्चीत बसेल, स्वत: दक्ष राहून कार्यालयाची सुरक्षा राखा़, असे फर्मान शनिवारी काढले़ विभागीय दर्जाच्या कार्यालयातील सुरक्षेचा आढावा ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशननंतर भालेराव यांनी घेत कार्यालयातील सुरक्षा आणि शिस्तीबाबत ठोस निर्णय घेतला आहे़ कार्यालयात असणाऱ्या सीसीटीव्ही आणि इतर यंत्रणा अपडेट करण्याच्या सूचनाही संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत़ ‘लोकमत’च्या चमूने मंगळवारी विभागीय दर्जाच्या कार्यालयातील सुरक्षा कशी वाऱ्यावर याबाबतचा सचित्र वृत्तांत प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ केवळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कार्यालयीन सुरक्षेचे कसे तीनतेरा होतात, हेच ‘लोकमत’ने आपल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे़ ‘लोकमत’च्या स्टींगनंतर शनिवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यापक बैठक पी़जी़ भालेराव यांनी घेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत झाडाझडती घेतली़ भविष्यात कार्यालयीन सुरक्षेबाबत असा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले़ महापालिकेसह प्रादेशिक परिवहन कार्यालयात कुणीही येऊन कोणाच्याही टेबलवर हस्तक्षेप करतं़ ही बाब निदर्शनास आल्यानंतर ‘लोकमत’ने हे स्टींग केले होते़ आरटीओसारख्या जबाबदार अधिकाऱ्याच्या कार्यालयातही चालणारा हा गलथानपणा उघड व्हावा़ त्यात खुद्द त्यांचेच दालन त्यांच्या गैरहजेरीत कसे बेवारस होते हे ‘लोकमत’ने दाखवून दिले होते़ महापालिकेने यानंतर तातडीने या स्टींगची दखल घेऊन ओळखपत्र आणि ड्रेसकोड केले़ आता लक्ष आरटीओ कार्यालयाकडे होते़ अखेर शनिवारी आरटीओंनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कार्यालयाच्या सुरक्षेवरून सक्त सूचना केल्या़ आरटीओच्या खुर्चीत बसले तरी तुम्ही काय करत होता, असा सवाल कर्मचाऱ्यांना करून कार्यालयाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना केल्या़ १८३ काळी-पिवळीच्या परवाना निलंबनाकडे लक्ष़़़४जिल्हा पोलिस अधिक्षकांनी १८३ काळी-पिवळीवर वाहन परवाना निलंबित करण्याच्या कारवाई संदर्भात प्रस्ताव केला आहे़ या प्रस्तावावर भालेराव काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे़