शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाडापाडीमुळे लेबर काॅलनी परिसरात उद्या कलम १४४ लागू, वाहतूक मार्गातही बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:33 IST

प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना लेबर कॉलनी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

औरंगाबाद : विश्वासनगर, लेबर कॉलनी येथे शासकीय निवासस्थानाची निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या काळात लेबर कॉलनीच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी लागू केले आहे.तसेच या परिसरातील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. 

या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन व्यक्तींच्या जीवितास इजा होऊ नये यासाठी उद्या, बुधवारी सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत लेबर कॉलनीतील रहिवासी व निष्कासन मोहिमेत सहभागी असणारे अधिकारी व अंमलदार, कर्मचारी तसेच प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणारे मजूर यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना लेबर कॉलनी परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाडापाडीमुळे वाहतूक मार्गात असतील बदललेबर काॅलनी येथील शासकीय निवासी इमारती जीर्ण झाल्याने त्या पाण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असल्याने त्यामुळे हा मार्ग उद्या, बुधवारी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. बंदोबस्तातील अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांस ही अधिसूचना लागू नसेल, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांनी कळवले आहे.

सदनिका धारकांची लेबर कॉलनीत आज शेवटची सायंकाळ; उद्या पहाटेपासून सुरु होणार पाडापाडी

हे मार्ग बंददिल्ली गेटमार्गे मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा व येणारा मार्ग मिलकाॅर्नरपर्यंत एसटी बस वाहतुकीसाठी बंद राहील. उद्धवराव पाटील चौक ते सिटी क्लब चौकाकडे जाणारा-येणारा मार्ग सर्व वाहतुकीसाठी, विभागीय आयुक्त निवास ते चांदणे चौक दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद राहतील. चांदणे चौक ते चेलीपुरा, मंजूरपुरा ते हर्षनगर, कामाक्षी लाॅज ते चेलीपुरा, किले अर्क ते कामाक्षी लाॅज हे रस्ते बंद राहतील.

हे पर्यायी मार्गदिल्लीगेट ते मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारी - येणारी वाहने, महामंडळाच्या बसेस जळगाव रस्त्याने सिडको बसस्थानकाकडून ये-जा करतील. उद्धवराव पाटील चौक-सत्यविष्णू हाॅस्पिटल-एन-१२ ते टीव्ही सेंटरमार्गे पुढे जातील. भडकल गेट तसेच टाऊन हाॅलकडील वाहने मनपा -जुना बाजार, सिटी चौक पोलीस ठाण्यासमोरून पुढे जातील. पंचायत समिती कार्यालयासमोरून चंपा चौक मार्गे पुढे जातील.

पाडापाडीसाठी ही यंत्रणाअधिकारी-९५मनुष्यबळ- ४००जेसीबी-१२पोकलेन-५रुग्णवाहिका-८डॉक्टर-४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद