शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम हातचा गेला; कोरोनामुळे मेंदी आणि अत्तर व्यावसायिक चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:31 IST

हजारो रुपयांची उलाढाल झाली ठप्प

ठळक मुद्देईदचा हंगाम हातातून गेला 

औरंगाबाद : रमजान ईदच्या निमित्ताने विविध प्रकारच्या अत्तरांची खरेदी आवर्जून केली जाते. मेंदी, अत्तर आणि सुरमा यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी रमजान ईदचा काळ हा एक मुख्य हंगाम असतो; पण यंदा मात्र ऐन हंगामात विक्री होत नसल्याचे मेंदी आणि अत्तर व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. 

याविषयी सांगताना अत्तर व्यावसायिक म्हणाले की, दरवर्षी रमजान ईदनिमित्त खास राजस्थान येथून मेंदी मागविली जाते. एक क्विंटल सुकी मेंदी मागविली तरी ती बऱ्याचदा पुरायची नाही. यातून एका व्यापाऱ्याची उलाढाल जवळपास ७० ते ८० हजार रुपये एवढी व्हायची; पण यावर्षी मात्र सगळे काही जवळपास शून्यावरच आले आहे. राजस्थानहून मेंदी मागविलेलीच नाही. मुंबई येथील व्यापाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी जे मेंदी कोन मागविण्यात आलेले होते, तेच अजूनही विक्रीविना पडून असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मेंदी व्यावसायिकांसाठी रमजान ईद, दिवाळी आणि लग्नसराई असे काही मोजके हंगाम आहेत. यापैकी ईद आणि लग्नसराई हे दोन मुख्य हंगाम हातातून गेले. आता दिवाळीनंतर पुढची लग्नसराई येईपर्यंत वाट बघण्याशिवाय हातात काहीही नाही, याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली.

अत्तर विक्री शून्यावरवर्षभराचा आढावा घेतला, तर अत्तर व्यावसायिकांसाठीही व्यवसायाच्या दृष्टीने रमजान ईदचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो. गरीब-श्रीमंत प्रत्येक जण यादरम्यान आपापल्या ऐपतीप्रमाणे अत्तर खरेदी करतो. उंची अत्तराच्या एका कुपीची किंमतही हजाराच्या घरात असते. मात्र, अत्तरप्रेमी या काळात पैशाचा फार विचार न करता हात मोकळा सोडून पैसा खर्च करतात; पण यावर्षी मात्र  व्यवसाय  पूर्णपणे  बंद असल्याने अत्तर व्यापाऱ्यांची ईदही सुनीसुनीच असणार आहे.

व्यवसाय ठप्पहात, नखे आणि केस रंगविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मेंदी रमजान ईदच्या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते; पण यावर्षी सगळेच व्यवसाय ठप्प झाल्याने लोकांकडे मेंदी, अत्तर घेण्यासाठी पैसेच नाहीत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांची इच्छा होत नाही, त्यामुळे मेंदी कोनाची विक्री ५ हजार रुपयांपर्यंतही गेलेली नाही. अत्तरची विक्री तर पूर्णपणे शून्यावर आली आहे.    - मोहसीन, अत्तर आणि मेंदी विक्रेते 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादMarketबाजार