शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

‘स्कूल चले हम’! सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना; अर्ज कधी व कोठे करायचा?

By विजय सरवदे | Updated: June 20, 2024 18:01 IST

पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी हजारांपर्यंत शिष्यवृत्ती!

छत्रपती संभाजीनगर : मागासवर्गीय समाजातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शिक्षणात मुलींची संख्या वाढावी, या उद्देशाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शालेय शिक्षणात मुलींचे प्रमाणही वाढले आहे.

मुलीला शिकवून तरी काय उपयोग? मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन होणार आहे, या मानसिकतेतून वयात येण्याअगोदरच मुलींचा बालविवाह लावून देणे, अर्ध्यातच मुलींना शाळेतून काढून टाकणे, असा कल पालकांचा वाढला होता. ही मानसिकता बदलण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असून, त्यास आता बऱ्यापैकी यश येत आहे. त्यापैकी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही वरदान ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो मुलींना या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळत असून, पालकांवर मुलींच्या शिक्षणावर होणार खर्चही कमी होत आहे. सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना दिली जाते. मात्र, यासाठी लाभार्थी विद्यार्थिनीची किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना?प्रामुख्याने मागासवर्गीय प्रवर्गातील शालेय विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती रोखून शाळेत मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे, या हेतूने शासनाने सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.

५वी ते ७वीपर्यंत ६००, तर वरच्या वर्गाला हजार रुपयेया शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

निकष काय?या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीची शाळेतील किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य, हाच एकमेव निकष आहे.

कागदपत्रे काय लागतात?राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला, शाळा ही माहिती जमा करून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करते.

अर्ज कधी व कोठे करायचा?या शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांना आता ऑनलाइनही अर्ज करता येतो. मात्र, जि. प. समाज कल्याण जिल्हा कार्यालयात ऑफलाइन देखील अर्ज सादर करू शकतात.

गतवर्षी १८ हजार मुलींना लाभगेल्या वर्षी या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जातीच्या इयत्ता ५वी ते ७वीपर्यंतच्या २१७३, तर ८वी ते १०वीपर्यंत ४७४२ विद्यार्थिनी, ओबीसी प्रवर्गाच्या इयत्ता ५वी ते ७ वीपर्यंतच्या १७१६, तर ८वी ते १०वीपर्यंत २३८७ आणि ‘व्हीजेएनटी’च्या ४०७६ अशा एकूण १८ हजार ९८३ मुलींना आर्थिक लाभ देण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद