शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळा अन् घोळ, कोरोना म्हणजे घोटाळेबाजांसाठी जणू इष्टापत्तीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 18:29 IST

२० महिन्यांत अनेक गैरप्रकार, कधी यंत्रसामुग्री, कधी रेमडेसिविर, तर लसीचा काळा बाजार, घोटाळा अन् घोळ

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जगभरासाठी कोरोना महामारी ठरत आहे. मात्र, या महामारीतही आरोग्य यंत्रणेतील काहींनी स्वत:चे खिसे भरण्याचा उद्योग केला. गेल्या २० महिन्यांत कधी रेमडेसिविरचा घोटाळा समोर आला, तर कधी लसीचा काळा बाजार समोर आला. आता पुन्हा एकदा पैसे आकारून लस न घेताच प्रमाणपत्र देणारी टोळी समोर आली.

अगदी ४ महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये वाळूज महानगरातील साजापूर येथे लसीचा काळा बाजार केल्याचा प्रकार समोर आला होता. धक्कादायक म्हणजे यामध्येही जि.प.च्या आरोग्य विभागाचेच कर्मचारी सापडले होते. याप्रकरणी जि.प.कडून चौकशी समिती नेमण्यात आली आणि नंतर लसीचा काळा बाजार केल्याप्रकरणी अटकेतील दोन आरोपी आरोग्यसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत होते. मात्र, लस मिळत नसल्याने काळा बाजार करणाऱ्यांकडून लस विकत घेण्याची वेळ ओढवत होती. आता समोर आलेल्या घोटाळ्यात लस न घेताच प्रमाणपत्र देण्याचा उद्योग सुरू होता.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी एक टोळी १६ एप्रिल रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केली होती. घाटीतील काही रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर ही टोळी गजाआड झाली होती. यातील एक आरोपी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी होता.

काही चर्चेतील प्रकरणे :सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांनातज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव असल्याचे कारण पुढे करून २६ सरकारी व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आले. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने १० ऑगस्ट २०२० रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून उघडकीस आणला.

पीपीई किटचा प्रयोगहापकिनकडून पीपीई किटला अधिकृत मंजुरी मिळण्याआधीच त्या किटला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रयोग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हे सर्व पीपीई किट एका कंपनीने सॅम्पल किट म्हणून दिले. हा सगळा प्रकार ‘लोकमत’ने ९ एप्रिल २०२० रोजी समोर आणला.

भोजनाला खर्चाला वाढीव दराची फोडणीऔरंगाबाद जिल्हा रुग्णालयात आहाराचा दर प्रतिव्यक्ती ११० रुपये असताना मनपात २१० रुपये, तर ग्रामीण भागांतील उपचार केंद्रात २१३ रुपये दर आकारण्यात येत असल्याचे समोर आले. हा प्रकारही ९ जुलै २०२० रोजी समोर आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद