शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

खरिपासाठी सव्वालाख मेट्रिक टन खताचा प्रस्ताव

By admin | Updated: May 14, 2017 00:34 IST

लातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची लगबग सुरू केली आहे़ या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे़ गतवर्षीचा आणि गत महिन्यात पुरवठा झालेला एकूण ३५ हजार ७१० मेट्रिक टन खत सध्या उपलब्ध आहे़गतवर्षी भीषण दुष्काळ असतानाही उन्हाची तीव्रता मात्र अधिक जाणवत नव्हती़ परंतु, यंदा पाणी उपलब्ध असतानाही उन्हाची तीव्रता वाढली आहे़ तापमानाचा पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे़ अशा परिस्थितीतही शेतकरी सध्या खरीप हंगामाची जोरदार तयारी करीत आहेत़ सध्या शेतीतील नांगरणी, मोगडणे, कुळवणे, धसकट वेचणे आदी मशागतीची कामे सुरू आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा या यंत्राद्वारे नांगरणीचा दरही वाढला आहे़ खरीप हंगाम जवळ येऊ लागल्याने अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांकडून हंगामातील साहित्याची जुळवाजुळवही सुरू केली आहे़जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे़ खरीप हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला असून, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख २६ हजार ४९० मेट्रिक टन खताचा प्रस्ताव सादर केला आहे़ आयुक्तांकडून ६० हजार ३०० मेट्रिक टन रासायनिक खतास मंजुरी मिळाली आहे़ गतवर्षीचा २८ हजार ८९८ मेट्रिक टन खत शिल्लक आहे़ तर गत महिन्यात ६ हजार ८१२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाला आहे़