शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ : वैद्यकीय प्रवेशासाठीच्या अध्यादेशावर न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:55 PM

‘फाईट फॉर जस्टीस’ फोरमची अध्यादेशावर स्वाक्षरी न करण्याची राज्यपालांकडे मागणी

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य शासनाने अध्यादेश आणला मेरिटची गळचेपी थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाची तयारी

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य शासनाने वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत आणलेल्या अध्यादेशाविरुद्ध आता न्यायालयात लढा देण्याची तयारी ‘सेव्ह मेरिट , सेव्ह नेशन’ फोरमकडून सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्या, खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा, यासह सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करून राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी फोरमने केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत सध्या आरक्षणाचा विषय गंभीर बनला आहे. सर्र्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य शासनाने वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी अध्यादेश आणला आहे. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्या, खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढवा, या मागणीसाठी ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’, ‘फाईट फॉर जस्टीस’ हा फोरम तयार करण्यात आला आहे. या फोरमची शनिवारी पहिली बैठक झाली. यावेळी मेरिटची गळचेपी थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.

फोरमचा कुठल्याही आरक्षणाला विरोध नाही. मात्र, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, गुणवत्ताधारकांवर अन्याय होता कामा नये, जागा वाढविल्या पाहिजेत, ही प्रमुख मागणी केल्याचे फोरममधील डॉक्टरांनी सांगितले. आरक्षणासंदर्भातील अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ई-मेलद्वारे डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, पालक यांच्यासह अनेकांकडून राज्यपालांकडे भावना व्यक्त करण्यात येत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून राज्यपाल कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यादेश काढून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्यानिर्णयाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आगामी कालावधीत न्यायालयात धाव घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने विविध क्षेत्रांतील व्यक्ती या आंदोलनात जोडले जात आहेत, असेही डॉक्टरांनी सांगितले.

याचिके ची तयारीसर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अध्यादेश काढण्यात आला. मात्र, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. राज्यपालांकडे बाजू मांडण्यात आलेली आहे. आता न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही तयारी केली जात आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढा लढला जाईल.    -डॉ. आर.एम. मुंदडा

राज्यस्तरीय कृती समितीडॉक्टरांसह वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक आता जोडले जात आहेत. महाराष्ट्र कृती समिती केली जाणार आहे. त्याद्वारे मेरिटची कशा प्रकारे गळचेपी सुरू आहे, याविषयी जनजागृती केली जाणार आहे. राज्यपालकांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.     -डॉ. संतोष रंजलकर

न्यायालयात आव्हानअध्यादेश अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यात नेमके काय आहे, हे माहीत ना

टॅग्स :reservationआरक्षणState Governmentराज्य सरकारStudentविद्यार्थी